महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा रासपला - तटकरे - NCP State President Sunil Tatkare

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 8:35 PM IST

Updated : Mar 30, 2024, 9:28 PM IST

Lok Sabha Elections : महायुतीतील जागावाटपाचा घोळ अद्याप सुटलेला नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदार संघाची जागा राष्ट्रवादीनं राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली आहे. या जागेवरून महादेव जानकर निवडणूक लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलंय.

Lok Sabha Elections
सुनील तटकरे

मुंबईLok Sabha Elections :लोकसभा निवडणुकीतपरभणी मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते (रासप) महादेव जानकर यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपला देण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं या जागेवरून महादेव जानकर निवडणूक लढवणार आहेत.

परभणीची जागा रासपकडं : 'आम्ही महायुतीमध्ये आठ जागा मागितल्या असून त्यापैकी दोन उमेदवार आम्ही यापूर्वीच घोषित केले होते. आता आमच्याकडं असलेल्या परभणी मतदारसंघाची उमेदवारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे', असं तटकरे यांनी सांगितलं. या जागेवरून रासपाचे नेते तथा माजी मंत्री महादेव जानकर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

अनिल मेटेकरांचा योग्य सन्मान :परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल मेटेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी केली होती. मात्र त्यांना भविष्यात योग्य संधी दिली जाईल, ते सुद्धा आपल्यासोबत काम करणार आहेत, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.

बारामती सुनेत्रा पवारांना उमेदवारी : काही जागांवरील पक्षानं केलेल्या दाव्यामुळं अडचणी आल्या. मात्र त्या अडचणी आता दूर होत आहेत. रायगड रत्नागिरी मतदारसंघात भाजपानं दावा सांगितला होता. मात्र, ती जागा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. तसंच बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा, नाशिक मतदारसंघाबाबत चाचणी सुरू असून नाशिकमधून भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबतची चर्चा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. सुप्रिया सुनेत्रा पवार यांनी बारामतीत मागच्या काही दिवसापासून प्रचाराला सुरुवात केलीय. मात्र, या दोघांचीही आज अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळं बारामती मतदार संघात रंगतदार निवडणूक होणार आहे.

हे वाचलंत का :

  1. लातूरात काँग्रेसला धक्का; शिवराज चाकूरकर यांच्या सून डॉक्टर अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश - Dr Archana Patil joins BJP
  2. नवनीत राणा यांच्यापासून देवेंद्र फडणवीसांना धोका - सुषमा अंधारे - Lok Sabha Elections
  3. महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जिंकण्याचा विश्वास - Amravati Lok Sabha
Last Updated : Mar 30, 2024, 9:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details