महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाटा मॅरेथॉनदरम्यान 75 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू - Tata Marathon

Tata Marathon : टाटा मॅरेथॉन दरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं 75 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र चांदमल बोरा (वय 75 वर्ष) असं मृताचं नाव आहे.

heart attack
heart attack

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 9:53 PM IST

मुंबई Tata Marathon:दक्षिण मुंबईत टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 7 प्रकार ठेवण्यात आले होते. यामध्ये फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन एलिट चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी, रन सीनियर सिटीझन, रन तसंच ड्रीम रन अशा सात श्रेणी होत्या.

हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू :या 19व्या मुंबई टाटा मॅरेथॉनचा आनंद अनेकांनी घेतला. मात्र, या मॅरेथॉनदरम्यान एका 75 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी दिली. राजेंद्र चांदमल बोरा असं मृताचं नाव आहे.

टाटा मॅरॅथॉन स्पर्धेत सहभाग :गोरेगाव पूर्व टॉवर रुस्तमजीमध्ये राहणाऱ्या पूजा डॉ. पुजा अमित जैन ( वय 44 वर्ष ) यांनी स्वतः आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली. डॉ. पूजा जैन यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचे वडील राजेंद्र चांदमल बोरा (वय 75 वर्ष) हे आज सकाळी टाटा मॅरॅथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आले होते. सकाळी 8.00 वाजेच्या सुमारास चालत असताना ते मरीन ड्राइव्हवर अचानक खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तत्काळ बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आलं. तेव्हा तिथं डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय. बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. अमित नांदोस्कर यांनी राजेंद्र बोरा यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं सांगितलं.

मृत्यूची नोंद दाखल :राजेंद्र बोरा टाटा मॅरेथॉनमध्ये आपल्या मुलीसह सहभागी झाले होते. मुलगी डॉक्टर पूजा जैन, राजेंद्र बोरा यांचे भाऊ नितीन बोरा यांचा जबाब आझाद मैदान पोलिसांनी नोंदवला आहे. त्यांची संशय तक्रार नसल्यानं आझाद मैदान पोलिसांनी मृत्यूची नोंद दाखल केली आहे.


हे वाचलंत का :

  1. चित्रपटगृहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करा; मंत्री उदय सामंतांचं आवाहन
  2. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, विधी विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
  3. 'मर्यादा पुरुषोत्तम राम' म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी काढली सुषमा स्वराज यांची आठवण

ABOUT THE AUTHOR

...view details