पुणे :अभिनेता राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध पक्ष संघटना तसंच शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त करत शिवप्रेमींची माफी देखील मागितली. आज त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या 'विश्वस्त' पदाचा राजीनामा दिला आहे.
भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा राजीनामा :गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठा सेवा संघाच्यावतीनं भांडारकर इन्स्टिट्यूट येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी 'भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त' पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. तसंच अनेक शिवप्रेमी संघटना, विविध पक्षांच्या वतीनं अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर आंदोलन देखील करण्यात आलं होतं.
"राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर देखील बैठकीत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे राहुल सोलापूरकर यांनी केलेलं वक्तव्य तसंच भूमिकेशी भांडारकर संस्थेचा काहीही संबंध नाही. त्यांनी आता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या 'विश्वस्त' पदाचा राजीनामा दिला असून संस्थेने तो स्वीकारला आहे. -सुधीर वैशंपायन, मानद सचिव, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था