कोल्हापूर :छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळी स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एका विशिष्ट विचारधारेनं त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. त्याच विचारधारेशी आपण आता लढत आहोत. आपली लढाई त्या विचारधारेशी आहे. "शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला," असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी कोल्हापुरात केला.
राहुल गांधींनी सांगितलं शिवरायांचा पुतळा पडण्याचं कारण :"छत्रपती शिवाजी महाराज यांनी हजारो वर्षापूर्वी राज्याभिषेक केला. मात्र या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करू दिला नाही. तीच विचारधारा आजही देशात आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. मात्र तो पुतळा काही दिवसातच कोसळला. कारण यांची विचारधारा चुकीची आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला," असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला.