महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरणातील मृतांच्या कुटूंबियांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; आर्थिक मदतीची केली घोषणा - Pune Porsche Car Hit And Run Case - PUNE PORSCHE CAR HIT AND RUN CASE

Pune Porsche Car Hit And Run Case : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी सोमवारी (24 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं.

CM Eknath Shinde
पुणे हिट अँड रन प्रकरणातील मृतांच्या कुटूंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट (CMO Office)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 10:56 PM IST

मुंबई Pune Porsche Car Hit And Run Case: पुणे कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकार या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणातील मृत तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर राज्य सरकार या मृत तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोषींवर कठोरात कठोर करवाई : घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असताना देखील, ही केस नव्याने उघडून त्यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावे यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

मृतांच्या कुटूंबियांना 10 लाख रुपये मदत : आईबापाच्या हाताशी आलेली मुलं अचानक गेल्यानं झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळं या दोन्ही मृत मुलांच्या कुटूंबियांना पुन्हा सावरता यावं यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचे मानले आभार: पुण्यात झालेल्या या घटनेनंतर यातील दोषींवर कठोर कारवाई करून कुणालाही पाठीशी घालू नये असं निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा वेगाने तपास होऊन अनेक जणांना अटक झाल्याचं या दोघांच्या वडिलांनी आणि कुटूंबियांनी मान्य केलं. तसेच आपल्याला भेटून आपले म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल आणि आपल्या मुलांसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.

पब्जवर कठोर कारवाई : पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले आहेत. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्यानं कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हेही वाचा -

  1. पुणे पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाली परेड; पाहा व्हिडिओ - Criminal Identification Parade
  2. निवडणुकीच्या रणधुमाळीत अमली पदार्थ विरोधी पथकाची 'मायानगरी'त मोठी कारवाई; 1 कोटी 34 लाखांचे ड्रग्ज जप्त, सात जणांना अटक - Drugs Seized
  3. पुणे ड्रग्स प्रकरणाचं आढळलं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, कुरिअर कंपनीद्वारे 'या' शहरात जाणार होते अमली पदार्थ

ABOUT THE AUTHOR

...view details