महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आजोबाला कोठडी, जाणून घ्या काय आहे अपघाताची ए टू झेड कहाणी - Pune Porsche Accident Case - PUNE PORSCHE ACCIDENT CASE

Pune Porsche Accident Case : पुणे पोर्शे कार अपघातानंतर मोठं राजकारण तापलं आहे. ससूनमधील डॉक्टरांनी अल्पवयीन तरुणाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाची ए टू झेड कहाणी जाणून घेऊया या खास वृत्तातून.

Pune Porsche Accident Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 9:37 AM IST

पुणे Pune Porsche Accident Case : पुण्यातील कल्याणी नगर येथील पुणे हिट अँड रन प्रकरणात त्या अल्पवयीन मुलासह त्याचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह दोन्ही बार मालक तसेच त्या बारचे मॅनेजर आणि आता ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर यांनाही अटक करण्यात आली. पुण्यातील या प्रकरणाची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससूनच्या डॉक्टरनं तर सगळ्यांची नावं उघड करेन, अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत या पुणे हिट अँड रन प्रकरणात काय काय झालं हे पाहूया.

विना नंबर प्लेट पोर्शे कार :कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर 19 तारखेच्या मध्यरात्री ग्रे कलरच्या पोर्शे कारनं दोघांना उडवलं होतं. या गाडीच्या दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसून एका अल्पवयीन तरुणानं मित्राच्या बरोबर पार्टी करून कार 200 च्या स्पीडनं चालवल्यानं दोघांना उडवल्याचं उघड झालं. यात दोन जणांचा मृत्यू झाला. बारावीत पास झाल्यावर आपल्या मित्रांसोबत पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला. या प्रकरणी त्या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी अटक केली.

अल्पवयीन तरुणाला लगेच जामीन आणि चर्चेला उधाण :कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात त्या अल्पवयीन तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केल्यावर त्याला बाल हक्क न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्या अल्पवयीन तरुणाला काही अटींवर जामीन दिला. अल्पवयीन आरोपीला पुढील पंधरा दिवस रस्त्यावर थांबून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यासोबत वाहतुकीचं नियोजन करणं बंधनकारक केलं. अल्पवयीन तरुणाला मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन घ्यावं लागणार आहे. भविष्यात त्याच्या हातून कुठलाही अपघात घडला तर अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार आहे. अल्पवयीन तरुणाला डॉक्टरांकडं जाऊन दारू कशी सोडावी, याबद्दल धडे घ्यावे लागणार आहेत. या अटीवर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. निबंध लिहिण्याच्या अटीवर सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा होऊ लागली आणि याबाबत मिम्स देखील व्हायरल झाले.

पार्टीत उधळले 'इतके' रुपये :कल्याणी नगर येथील कोझी आणि ब्लॅक बारमध्ये त्या अल्पवयीन तरुणानं त्याच्या मित्रांच्या बरोबर पार्टी केली. त्यानं चिकन, स्माईली चिकन बाऊ इ. खाद्य पदार्थ जेपण्याकरीता ऑर्डर केले. त्याच्यासोबत महागडी मद्य देखील ऑर्डर केली. याचं बिल 75 हजार रुपयाहून अधिक आलं असल्याचं सांगितलं जात आहे.

वडील तसेच बार मालकांना अटक :या प्रकरणी या अल्पवयीन तरुणाच्या वयाबाबत कोणत्याही प्रकारची खात्री न करता त्यास हॉटेल कोझिचे मालक भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर यांनी मद्याच्या बॉटल पिण्याकरीता सर्व्ह केल्या. वडील विशाल अगरवाल यांनी त्यांचा मुलागा अल्पवयीन असल्याचं माहीत असताना तसेच आपल्या मुलाचं कार चालवण्याचं प्रशिक्षण झालं नसताना त्याच्याकडं कार चालवण्यासाठी दिली. त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असं माहीत असताना त्याला पोर्शे कार चालवण्यासाठी दिली. याबत पुणे पोलिसांकडून कोझी आणि ब्लॅक बारचे मालक तसेच मॅनेजर प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, जयेश बोनकर आणि त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

फक्त 1758 रूपये न भरल्यानं पोर्शे कारला मिळाला नाही क्रमांक :आलिशान पोर्शे कारनं दोन जणांचा जीव घेतला आहे, त्या कारची आरटीओ कार्यालयात नोंदणीच झालेली नाही. नोंदणी न होताच ती गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवर चालवली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे या आलिशान कारसाठी जो नोंदणी फी 1758 रुपये आहे ती न भरल्यानं तिला नोंदणी क्रमांक देण्यात आला नसल्याचं यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं.

पुणे हीट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन तरुणाचा जामीन रद्द :पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाला बाल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर बाल न्याय मंडळानं निर्णय दिला असून त्या अल्पवयीन तरुणाचा जामीन रद्द केला. त्या अल्पवयीन तरुणाची 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

मुलाच्या आजोबाला देखील अटक :पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली. सुरेंद्र कुमार आगरवाल यांनी ज्यांची ज्यांची फसवणूक केली, छोटा राजनच्या नावानं धमक्या दिल्याचं प्रकरण समोर येऊ लागलं. यातील अनेक तक्रारदार हे आता समोर आले आहेत.

अपघातस्थळी युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा :पुण्यातील कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाला बाल हक्क न्यायालयानं काही अटींवर जामीन दिला होता. त्यात त्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं कल्याणी नगर येथील त्या अपघातस्थळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं.

ससूनमधील डॉक्टरांनी बदलले रक्ताचे नमुने :पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे यांनी अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले. मात्र ते रक्ताचे नमुने या डॉक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. दुसर्‍या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने वापरले असून या प्रकरणी या तिघांना अटक करण्यात आली.

पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर 49 पब आणि बारवर कारवाई :कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात 14 पथकांमार्फत धडक कारवाई करणयात आली. या मोहिमेत 49 पब आणि बारवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी पब आणि बंद करुन सील करण्यात आले.

दोन पोलीस अधिकारी निलंबित :कल्याणी नगर अपघात प्रकरणी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांनी येरवडा पोलीस स्टेशन इथंच पैसे घेतल्याचा आरोप केला. याचा तपास करत पोलिसांनी येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं.

ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी चौकशी समिती :पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी त्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. आता या प्रकरणी वैद्यकीय विभागानं नेमलेली त्रीसदस्यीय समिती ससून रुग्णालयात दाखल झाली आहे.

हेही वाचा :

  1. पुणे हिट अँड रन अपघात : 'त्या' अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं 'या' अटींवर दिला जामीन - Pune Accident News
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी - Pune Hit And Run Case
  3. भरधाव वेगातील आलिशान कारची दुचाकीला धडक, पार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू - Pune Accident

ABOUT THE AUTHOR

...view details