पुणे : केवळ राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील 21 विधानसभा मतदार संघात मतमोजणीसाठी मतदारसंघनिहाय ईव्हीएम मतमोजणीसाठी 391 आणि टपाली, ईटीपीबीएस मतमोजणीसह एकूण 506 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. पुणे जिल्ह्यात मतमोजणी करताना सर्वाधिक 30 फेऱ्या या पुरंदर विधानसभा मतदारसंघात होणार आहेत. तर बारामती मतदार संघात सर्वाधिक 30 टेबल ठेवण्यात आले आहेत.
मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज :जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ मिळून ईव्हीएम मतमोजणीसाठी 391, टपाली मतमोजणीसाठी 87 तर ईटीपीबीएससाठी 28 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्नर आणि आंबेगाव मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येकी 18 टेबल, टपाली मतपत्रिकांसाठी 6 तर ईटीपीबीएस मतमोजणीसाठी अनुक्रमे 1 आणि 2 टेबल ठेवण्यात येणार असून इथं 20 फेऱ्या होणार आहेत. खेड आळंदीत ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल, टपाली मतपत्रिकांसाठी 4 टेबल आणि 20 फेऱ्या होतील. शिरुर-ईव्हीएम मतमोजणीसाठी 24 टेबल, टपाली- 4, ईटीपीबीएस- 2 टेबल आणि 24 फेऱ्या होणार आहेत. दौंड- ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल, टपाली-5, ईटीपीबीएस-1 टेबल आणि 23 फेऱ्या होणार आहेत. तर इंदापूरसाठी ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल, 6 टपाली, ईटीपीबीएस 1 टेबल आणि 24 फेऱ्या होणार आहेत.
बारामती मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल, टपाली- 8, ईटीपीबीएस- 2 टेबल, 20 फेऱ्या होतील. पुरंदरमध्ये ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल, टपाली-6, ईटीपीबीएस- 2 टेबलची व्यवस्था करण्यात आणि असून इथं 30 फेऱ्या होतील. भोरमध्ये ईव्हीएम मतमोजणीसाठी 24 टेबल, टपाली-3, ईटीपीबीएस-3 टेबल, 24 फेऱ्या होतील. मावळ मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल, टपाली-2, ईटीपीबीएस 1 टेबलची व्यवस्था करण्यात आलीय. इथं 29 फेऱ्या होतील. चिंचवडमध्ये- ईव्हीएम मतमोजणीसाठी 24 टेबल, टपाली-4, ईटीपीबीएस-1 टेबल, 24 फेऱ्या होतील, पिंपरी- ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल, टपाली-3, ईटीपीबीएससाठी 1 टेबल ठेवण्यात येणार असून 20 फेऱ्या होणार आहेत.