पुणेZika Virus In Pune :पुण्यातील मुंढवा झिका व्हायरसचा आणखी एक रुग्ण सापडला. त्या रुग्णाची तब्येत चांगली असल्याचं पुणे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. दरम्यान झिकाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेनं एरंडवणे, मुंढवा भागात संशयित रुग्णांचं सर्वेक्षण सुरू केलं आहे. आठ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. पुणे शहरात सुरुवातीला एरंडवणे येथे झिकाचे दोन रुग्ण आढळले. त्यानंतर हडपसर येथे एक रुग्ण आढळून आला आणि आता मुंढवा भागात एका रुग्णाची नोंद झाली आहे. आता शहरात एकूण 4 रुग्ण झाले असून या चारही रुग्णांची तब्येत चांगली आहे.
पुण्यात आढळला झिकाचा चौथा रुग्ण, महापालिकेचा आरोग्य विभाग लागला कामाला - Zika Virus In Pune - ZIKA VIRUS IN PUNE
Zika Virus In Pune : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरात आतापर्यंत तिघांना झिकाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. असं असताना आता पुणे शहरातील मुंढवा भागात एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याचं निदर्शनास आलं. यामुळे आता शहरात झिकाचे चार रुग्ण झाले आहेत.
Published : Jun 29, 2024, 5:50 PM IST
आरोग्य विभागाचे सर्वेक्षण सुरू :झिकाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं सर्वेक्षण सुरू केलं आहे. एरंडवणे येथे दोन रुग्ण आढळल्यानं परिसरातील खिलारवाडी, गणेशनगर, सिंहगड रस्ता भागात २ हजार ४२२ नागरिकांचं सर्वेक्षण केलं आहे. यामध्ये पाच गर्भवती मातांचे आणि तीन संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. २ हजार ४७३ घरांचे अळी सर्वेक्षण केले. त्यात ७९ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. तसेच पाच हजार ४४ पाणीसाठ्याची तपासणी केली. त्यामध्ये १३५ ठिकाणी डासांच्या आळ्या आढळल्या. मुंढव्यातील २ हजार ८९ नागरिकांचे सर्वेक्षण केले. तर १ हजार ५० घरांमध्ये अळी सर्वेक्षण केले. त्यापैकी ४९ ठिकाणी आळी आढळली. एकूण ३ हजार ५२३ पाणीसाठ्याचे सर्वेक्षण केले. त्यापैकी ७३ ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. या सर्व भागात औषध फवारणी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.
खासगी रुग्णालयांनीही माहिती देणं आवश्यक :खासगी रुग्णालयात डेंगी, झिका, चिकुनगुनिया अशा आजारांचे रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर त्याची माहिती त्वरित महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात यावी. माहिती देण्यास टाळाटाळ करू नये अशी सूचना महापालिकेने खासगी रुग्णालयांना केली आहे, अशी माहिती यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, झिका व्हायरस बाबत कोणीही घाबरून जाऊ नये. नागरिकांनी संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालावेत. तसेच डास चावू नयेत यासाठी शरीराला क्रीम लावावी आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांना रोखण्यासाठी उपाययोजना करावी. फ्रिज, कुलर, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये आणि प्लॅस्टिकचे कप, नारळाच्या कवट्या, टायरमध्ये पाणी साचून देऊ नये. तसेच ज्यांना लक्षणे आढळून आली आहे अशा रुग्णांनी तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन देखील यावेळी डॉ. स्मिता सांगडे यांनी केलं आहे.
हेही वाचा:
- NEET पेपर लिक प्रकरण ; चौकशीसाठी सीबीआयचं पथक आज धडकणार लातूरमध्ये - NEET Paper Leak Case
- "प्रज्ञा सातव यांना तिकीट दिलं तर विरोधात काम करू..."; ठाकरे गटाच्या खासदाराचा काँग्रेसला इशारा - Nagesh Patil Ashtikar
- NEET प्रकरणी लातूरातून एप्रिलमध्ये NTA ला पत्र, लातूरच्या दिलीप देशमुखांची माहिती - NEET Paper leak Case