छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Potholes On Samruddhi Mahamarg : वेगात दोन जिल्ह्यांचे अंतर कापण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. माळीवाडा टोलनाकापासून वैजापूर दिशेनं जाताना जवळपास दहा किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालाय. काही महिन्यांपूर्वी रस्त्याला तडे जाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सिमेंटचे पोपडे निघून गेल्यानं रस्त्याच्या कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या समृद्धी महामार्गावर भेगाच नाही तर खड्डे देखील; टोल देऊनही जीव मुठीत घेऊन प्रवास - Samruddhi Mahamarg Potholes
Potholes On Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरणार असल्याचा दावा करत आणि मोठा गाजावाजा करत मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधला खरा, मात्र अवघ्या काही वर्षांत या समृद्धी महामार्गाची दैना वेळोवेळी समोर आली आहे. अशातच आता या जागतिक दर्जाच्या महामार्गाला खड्डे पडल्याचं दिसून आलंय.
Published : Aug 29, 2024, 8:08 PM IST
टोल देऊन रस्ता निकृष्ट : समृध्दी महामार्गावरून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टोल अकराला जातो. 1.70 पैसे प्रति किलोमीटर इतका टोल आकारण्यात येत असला तरी त्या मानाने रस्त्याचा दर्जा नसल्याचा ओरड प्रवाशांनी केला. वेगानं जात असताना वाहन स्थिर चालत नाहीच, शिवाय रस्त्याला तडे गेले तर कुठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याला इतका टोल द्यावा का? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केलाय. समृद्धी महामार्गावरून जाताना पैसे देऊन देखील सुरक्षित प्रवास होईल याची शाश्वती नाही. त्यामुळं महामार्ग तयार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार कधी? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा -