नागपूर :विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. प्रत्येक मतदाराला निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आज जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात पोलिंग पार्टी रवाना झाल्या आहे. जिल्ह्यात ऐकून 4 हजार 631 मतदान केंद्र तयार करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिलं जातं आहे. सुमारे 45 लाख 25 हजार 997 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यात 4 हजार 631 मतदान केंद्र : नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 4 हजार 631 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघात 332, सावनेर 370, हिंगणा 472, उमरेड 395, कामठी 524, रामटेक 359, नागपूर दक्षिण पश्चिम 378, नागपूर दक्षिण 350, नागपूर पूर्व 364, नागपूर मध्य 308, नागपूर पश्चिम 351 आणि नागपूर उत्तर 407 अशी एकूण 4 हजार 631 मतदान केंद्र असणार आहेत. सुमारे 3 हजार 460 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग केलं जाणार आहे. शहरी भागात 2 हजार 169 म्हणजे 100 टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होईल. तर ग्रामीण भागातील 53 टक्के मतदान केंद्र म्हणजेच 1 हजार 291 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार, असल्याची माहिती डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
127 मतदान केंद्र संवेदनशील :नागपूर जिल्ह्यातील जिल्ह्यात सूमारे 127 मतदान केंद्र 'संवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्र' म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. याच बरोबर या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलीस बल तत्पर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील मतदारसंघात कुठे किती मतदार? :नागपूर शहरात 6 आणि जिल्ह्यात 6 असे एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सर्वात सर्वाधिक लोकसंख्या कामठी विधानसभा मतदारसंघात आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या रामटेक विधानसभा मतदारसंघात आहेत. कामठीत 5 लाख 1 हजार 770 मतदार आहेत. त्यामध्ये 2 लाख 51 हजार 369 पुरुष आणि 2 लाख 50 हजार 383 महिला मतदार आहेत. रामटेकात 2 लाख 86 हजार 931 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 43 हजार 540 पुरुष आणि 1 लाख 43 हजार 389 महिला मतदार आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघात 2 लाख 81 हजार 367 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 42 हजार 623 पुरुष आणि 1 लाख 38 हजार 738 महिला मतदार आहेत. सावनेर 3 लाख 21 हजार 817 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 61 हजार 701 पुरुष आणि 1 लाख 60 हजार 114 महिला मतदार आहेत. हिंगणामध्ये 4 लाख 50 हजार 141 मतदार आहे, त्यामध्ये 2 लाख 32 हजार 148 पुरुष आणि 2 लाख 17 हजार 964 महिला मतदार आहेत. उमरेड विधानसभा मतदारसंघात 3 लाख 957 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 52 हजार 695 पुरुष आणि 1 लाख 48 हजार 261 महिला मतदार आहेत.