मुंबई Sharad Pawar vs Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना उबाठा पक्षाला नऊ जागा तर शिवसेना शिंदे पक्षाला सात जागा मिळाल्या. मात्र राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं फारशा जागा लढवल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष लोकसभेत पाहायला मिळाला नव्हता. मात्र आता विधानसभेत याबाबतचा संघर्ष निश्चित पाहायला मिळणार आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसनं 2019 मध्ये 55 जागांवर विजय मिळवला. या जागांवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं जर दावा सांगितला, तर निश्चितच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना किमान 55 मतदार संघांमध्ये पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडं कोणते आहेत मतदारसंघ? :राष्ट्रवादी काँग्रेसकडं सध्या 55 मतदार संघ आहेत. यापैकी 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या 55 जागांवर दावा करत आहे. यामध्ये अमळनेर, सिंदखेड राजा, काटोल, तुमसर, अर्जुनी, मोरगाव, अहेरी, पुसद, वसमत, घनसावंगी, कळवण, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी, देवळाली विक्रमगड, शहापूर, मुंब्रा कळवा, अनुशक्ती नगर, श्रीवर्धन, जुन्नर आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर इंदापूर, बारामती, मावळ, पिंपरी, वडगाव शेरी, हडपसर, अकोले, कोपरगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, कर्जत जामखेड, माजलगाव, बीड, आष्टी, परळी, अहमदपूर, उदगीर, माढा, मोहोळ, पंढरपूर, फलटण, वाई, कराड उत्तर, चिपळूण, चंदगड, कागल, इस्लामपूर, शिराळा आणि तासगाव कवठे महांकाळ.