महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएम मशीनशी जोडलेला फोनच रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला, पोलिसांच्या भूवया उंचावल्या - Ravindra Waikar

Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याची मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. वनराई पोलिसांच्या रडारवर वायकरांचा मेहुणा मंगेश पंडिलकर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

Ravindra Waikar
खासदार रवींद्र वायकर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 6:11 PM IST

मुंबईRavindra Waikar:EVM मशीनशी जोडलेला फोनच खासदार रवींद्र वायकरांच्या मेहुण्याला वापरायला दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच मोबाईल फोनने EVM मशीन अनलॉक करण्यात आली. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन अनलॉक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूवया देखील उंचावल्या असून निवडणूक आयोगाची देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तो फोन फॉरेन्सिक लॅबला पाठविला :पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी रवींद्र वायकरांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई होती. वनराई पोलिसांनी पंडिलकर यांच्याकडील मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक लॅबला पाठवला असल्याची माहिती मंडळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभार यांनी दिली आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आणखी एकाला नोटीस :फॉरेन्सिक लॅबमध्ये फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. तसेच पंडिलकर यांनी कोणाशी बोलण केलं याचा देखील वनराई पोलीस तपास करणार आहेत. मंगेश पंडिलकर यांच्यासह आणखी एकाला ४१(अ) ची नोटिस पोलिसांनी बजावत हजर राहण्याचा समन्स जारी केला आहे.

मोबाईल गैरवापरप्रकरणी राहुल गांधींची पोस्ट : खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्यानं मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचं प्रकरण आता गंभीर वळण घेत आहे. ईव्हीएम मशीनशी जोडलेला फोनच वायकरांच्या मेहुण्याला वापरायला दिल्याची माहिती आहे. मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीतील हा प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे.

ब्लॅक बॉक्सच्या छाननीचा अधिकार कुणालाही नाही : रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्टमध्ये म्हटले, " ईव्हीएम हा एक 'ब्लॅक बॉक्स' आहे. कोणालाही ब्लॅक बॉक्सची छाननी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा ( निवडणूक आयोग) संस्थांमध्ये उत्तरदायित्व सांभाळत नाही, तेव्हा लोकशाही केवळ व्यवस्था म्हणून उरते. तेव्हा फसवणूक होण्याची शक्यता असते."

काँग्रेसनं विचारले दोन प्रश्न : मुंबईत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यावर काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसनं म्हटलं, "एनडीए उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल हा ईव्हीएमशी का जोडण्यात आला? मतमोजणी केंद्रावर मोबाईल कसा नेण्यात आला? या शंका निर्माण करणाऱ्या पोस्टबाबत भारतीय निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं."

हेही वाचा:

  1. अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला घेऊन गुन्हे शाखेचं पथक मुंबईत दाखल - Maharashtra politics live updates
  2. खवय्यांसाठी पुण्यात चक्क 'लेडी बाऊन्सर' तैनात; काय आहे नेमकी भानगड? - Society Bouncers Pune
  3. रेल्वे मंत्रालयानं "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स" मध्ये मिळवलं स्थान; केला 'हा' मोठा विक्रम - Limca Book of Records

ABOUT THE AUTHOR

...view details