मुंबई Woman Molesting In Mumbai : पदोन्नती देण्याच्या नावाखाली सहाय्यक कामगार आयुक्तानी एका महिलेला कॅबिनमध्ये बोलवून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पायधोनी पोलिसांनी आयुक्तांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, चौकशी सुरू आहे.
गुन्हा दाखल :"36 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी दिनेश दाभाडे (वय 49) यांच्याविरोधात भारतीय दंड संविधान कलम 354 आणि 354 'अ' अन्वये गुन्हा दाखल केला. तसंच दिनेश दाभाडे यांनाही संबंधित प्रकरणाची नोटीस देण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी सुरु आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक बाळवृष्ण देशमुख यांनी दिली. दिनेश दाभाडे हे धातू, कागद बाजार, दुकान माथाडी कामगार मंडळाचे सहाय्यक कामगार आयुक्त आहेत. तसंच पीडित महिला 2019 मध्ये कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाली होती.
नेमकं काय घडलं? : सहाय्यक लेखापाल पदावर बढतीसाठी दाभाडेंनी पीडित महिलेला आपल्या कक्षात बोलवलं. दुपारी दोन वाजेच्या सुमारास जेवण करून महिला दाभाडेंकडं गेली. आज तुम्हाला लेखी विभागातील कामाबाबत पदोन्नती ऑर्डर देत आहे, असं दाभाडे म्हणाले. पीडित महिला दाभाडे यांच्या समोरील खुर्चीवर बसली असता दाभाडे खुर्चीवरुन उठून बोलत-बोलत ती बसलेल्या खुर्चीजवळ आले. त्यानंतर टेबलावर ठेवलेला महिलेचा हात दाभाडे यांनी पकडला. तसंच शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत् केला, असा आरोप पीडित महिलेनं केला.
पीडित महिलेचा आरोप : या कृत्यामुळं मला अपमानास्पद वाटलं. ही बाब इतर दोन कर्मचाऱ्यांनाही सांगितली. त्यानंतर मला सेवा समाप्तीचं पत्र देण्यात आलं, असंही पीडित महिलेनं सांगितलं. संबंधित महिलेनं याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला नोटीस देण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
हेही वाचा
- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी; आरोपीला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा - Thane Crime News
- तपासणीकरिता आलेल्या विद्यार्थिनीचा डॉक्टरकडून विनयभंग, डॉक्टरांसह महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल - Srirampur News
- बगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर विनयभंगाचा आरोप, पोलीस अधिकारी राजभवनात दाखल - Governor Bose accused molestation