महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जोडप्याकडून पैसे उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन, नवघर पोलीस ठाण्यातील घटना - Police personnel suspended

Police personnel suspended : पोलीस कर्मचाऱ्यानं धमकावून पैसे मागितल्याचा आरोप एका जोडप्यानं केला. याबाबत तक्रार दाखल करुन चौकशी करण्यात आली. यात दोषी आढळल्यानं पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय.

Police personnel suspended
पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 9:52 PM IST

ठाणे (भाईंदर) Police personnel suspended :भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाई सूर्यकांत केंद्रे यांनी एका जोडप्याला धमकावून पैसे उकळल्या प्रकरणी निलंबित करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेने पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली.

काय आहे नेमकं प्रकरण? : मीरा- भाईंदर वसई- विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढती गुन्हेगारी रोखण्याचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलीस खाते बदनाम करण्याचे काम काही कर्मचारी, अधिकाऱ्याकडून होताना दिसत आहे. याच आठवड्यात भाईंदर पूर्वेच्या लल्लन तिवारी कॉलेज परिसरात एक जोडपं गप्पा मारत होते. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (महानगरपालिका सेवेत कार्यरत) असलेल्या गोकुळ पुरहे यांनी या जोडप्याला हटकलं. त्यानंतर सूर्यकांत केंद्रे यांना फोन करून घटनास्थळी बोलवण्यात आलं.

धमकावून मागितले पैसे :यावेळी पोलीस शिपाई सूर्यकांत यांनी संबंधित जोडप्याकडं पैशांची मागणी केली. पैसे द्या अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करू, असे धमकावून अंदाजित १९ हजार रुपये उपस्थित महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (महानगरपालिका सेवेत कार्यरत) असलेल्या गोकुळ पुरहे यांच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर केले. वरील सर्व माहिती ही तक्रारदारानं पोलीस तक्रारीत दिली.

संबंधित कर्मचारी पैसे मागत असल्याचं आढळून आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. पुढील चौकशी सुरू आहे. -प्रकाश गायकवाड, पोलीस उपायुक्त, मीरा भाईंदर परिमंडळ-१

पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन : संबंधित जोडप्यानी थेट या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी या घटनेचा तपास केला असता, नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सूर्यकांत केंद्रे हे दोषी असल्याचे आढळून आलं. त्या विरोधात अहवाल वरिष्ठांकडे सादर करून वरिष्ठांनी सूर्यकांत केंद्रे यांना निलंबित करून, खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

'गोकूळ' दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; सत्ताधारी - विरोधक भिडले - Gokul Annual General Meeting

यंदा गणेशोत्सवात 'पीओपी'च्या गणेश मूर्तींवर बंदी नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा मूर्तीकारांना दिलासा - POP Ganesh Murti Banned

या पाववड्याची चव लय न्यारी; गरमागरम देतोय दारोदारी फिरून घरोघरी - Shirdi Pav Wada Special Story

ABOUT THE AUTHOR

...view details