मुंबईMumbai Crime News: पोलिस कर्मचारी (Police Constable) विशाल पवार कर्तव्यावर जात असताना, 27 एप्रिल रोजी रात्री नऊ ते दहा सुमारास माटुंगा ते सायन स्टेशनच्या दरम्यान लोकल स्लो झाली होती. विशाल हे फोनवर दरवाजा जवळ बोलत असल्याचा फायदा घेऊन चोराने फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विशाल हे देखील गाडीच्या खाली उतरून चोराचा पाठलाग केला. मात्र, याच मोबाईल चोर टोळीने एकत्र येऊन विशाल पवार त्याच्या पाठीत विषाचे इंजेक्शन दिले आणि लालसर द्रव्य पाजून त्यांची हत्या केल्याची माहिती, दादर मध्य रेल्वे जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली.
उपचारा दरम्यान झाला मृत्यू : या प्रकरणी पहिल्यांदा कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 328, 34, 392 आणि 394 अन्वये तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा गुन्हा रेल्वेच्या हद्दीत घडल्यामुळं दादर रेल्वे जीआरपीकडं वर्ग करण्यात आला. तक्रारदार विशाल पवार यांना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अचानक तब्येत बिघडल्यानं वागळे इस्टेट येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर 1 मे रोजी विशाल पवार यांचा मृत्यू झाला.
मोबाईल चोराचा केला पाठलाग: ठाण्यातील सिविल हॉस्पिटलमधील उष्माघात कक्षात दाखल असताना विशाल पवार यांनी कोपरी पोलिसांना सांगितलं की, त्यांची रात्रपाळी असल्यानं 27 एप्रिल रोजी ठाण्यातील कोपरी येथील राहत्या घरातून साडेआठ वाजताच्या सुमारास ठाणे येथून भायखळा येथे जाण्यासाठी लोकल ट्रेनने जात होते. माटुंगा रेल्वे स्टेशन अगोदर ट्रेन स्लो झाली होती. सव्वा नऊ वाजताच्या सुमारास स्पायरहून कोणीतरी अज्ञात इसमाने विशाल यांचा मोबाईलवर फटका मारून मोबाईल खाली पडला आणि मोबाईल घेऊन पळून जाऊ लागला. त्यावेळी लोकल ट्रेन स्लो असल्यानं तेसुद्धा ट्रेनमधून खाली उतरून मोबाईल चोराचा पाठलाग करू लागले.