पोलीस भरती प्रक्रिया सुरु अमरावती (ETV Bharat Reporter) अमरावती Police Bharti News : गेल्या अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीला फळ यावं, यासाठी उमेदवार आपली पूर्ण शक्ती पणाला लावत असल्याचं दृश्य आहे. अमरावतीमध्ये पहाटे चार वाजल्यापासून पोलीस दलात भरती होण्यासाठी उमेदवार मैदानावर पोहोचले आहेत. छाती फुगवणे, 100 आणि 1600 मीटर धावणे तसंच गोळा फेक या प्रक्रियेद्वारे प्रत्यक्ष मैदानी चाचण्या पोलीस मुख्यालयात सुरू झाल्या आहेत. ग्रामीण पोलीस दलासाठी जोग स्टेडियम येथे भरतीला सुरुवात झाली आहे.
उमेदवारांसाठी बिस्किट आणि केळीची व्यवस्था: अमरावती शहर भरतीसाठी अनेक युवक पहाटे चार वाजल्यापासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोहोचले. मैदानावर पोहोचलेल्या सर्व उमेदवारांसाठी बिस्किट आणि केळीची व्यवस्था पोलिसांच्या वतीनं करण्यात आली आहे.
अशी सुरू आहे भरती: पोलीस भरतीसाठी मैदानावर येणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर त्यांची उंची आणि छाती मोजली जात आहे. छाती आणि उंचीत भरणाऱ्या उमेदवारांना विशिष्ट क्रमांकाचा बिल्ला देऊन 100 मीटर धावणे आणि गोळा फेक या प्रक्रियाला उमेदवारांना समोर जाव लागेल.
शहर पोलिसात 74 जागांसाठी चार हजारांवर अर्ज: अमरावती शहर पोलीस दलात एकूण 74 जागांसाठी 4 हजार 789 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये तीन हजार 816 पुरुष आणि 973 महिला उमेदवारांनी देखील अर्ज केलं आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या उपस्थितीत भरती प्रक्रिया राबविली जात आहेत. "24 जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे," अशी माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी ईटीव्ही' भारत'शी बोलताना दिली.
ग्रामीण पोलिसात 207 जागांसाठी 27000 उमेदवार:अमरावती ग्रामीणमध्ये 207 जागांसाठी 27 हजार 981 उमेदवारांनी अर्ज केलं आहेत. ग्रामीण पोलीस दलासाठी जॉब स्टेडियम येथे सकाळी सात वाजल्यापासून उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे. उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे, आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केलं आहे.
राज्यात बेरोजगारीची दाहकता-पोलीस भरतीसाठी भरण्यात आलेल्या अर्जांची टक्केवारी बघता भरती निमित्तानं राज्यातील बेरोजगारीची दाहकता समोर आली आहे. राज्यात तसच देशात बेरोजगारीमुळे तरूण पिढी त्रस्त आहे. इच्छित नोकरी मिळत नसल्यानं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा मिळेल, त्या नोकरीसाठी तरूण पिढी प्रयत्न करताना दिसत आहे. अभियंता, एमबीए, बी.टेक आणि वकिलांनीदेखील पोलीस भरतीसाठी अर्ज केलाय.
हेही वाचा
- तरुणांसाठी आनंदाची बातमी! पोलीस भरतीची प्रक्रिया 'या' तारखेपासून होणार सुरू - Police Recruitment Process
- Sharad Pawar On Police Bharti : कंत्राटी पोलीस भरतीला शरद पवारांचा विरोध; म्हणाले, महिलांना...