महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक (ETV Bharat Reporter) सातारा Raid On Prostitution Business :अनाथ आश्रमाच्या नावाखाली एका महिलेला जबरदस्तीनं देह व्यापार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार टेंभू (ता. कराड) इथं उघडकीस आला आहे. टेंभू हे गाव समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं जन्मगाव असून या घटनेमुळे समाजसुधारकांच्या विचारांनाच हरताळ फासला गेला आहे. या प्रकरणात एका महिलेसह एका नराधमाला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षकांनी छापा मारुन केली कारवाई :टेंभू इथल्या एक महिला अनाथ आश्रमाच्या नावावर महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यामुळे अमोल ठाकूर यांनी पोलीस पथकासह टेंभू गावात छापा टाकला. अनाथ आश्रमाची पाहणी केली असता त्यठिकाणी एक वृद्ध महिला आणि तिची 21 वर्षाची गतीमंद मुलगी राहत असल्याचं आढळून आलं. गतीमंद मुलीची वैद्यकीय तपासणी करुन पोलिसांनी तिला आशाकिरण वसतिगृहात पाठवलं. अनाथ आश्रमात आणखी कोणी महिला, मुली येतात का, याची माहिती पोलीस घेत आहेत.
पीडित महिला पोहोचली थेट पोलीस मुख्यालयात :पीडित महिला ही सातारा जिल्ह्यातील असून बुधवारी ती थेट पोलीस मुख्यालयात पोहचली. त्याठिकाणी तीनं आपबिती माध्यमांना कथन केली. ही माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलिसांचं पथक साताऱ्यात पोहोचलं. पोलिसांनी तिला कराडला आणलं. पीडितेची चौकशी करुन तक्रार दाखल करुन घेण्यात आला. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी तिची टेंभू येथील अनाथ आश्रम चालक महिलेशी ओळख झाली. या महिलेनं पीडितेला आश्रमात नेवून पैशासाठी देह व्यापार करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार पीडितेनं दिली.
संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी :पीडितेच्या तक्रारीवरुन कराड ग्रामीण पोलिसांनी अनाथ आश्रम चालक महिलेसह वाल्मीक महादेव माने (रा. म्हासोली, ता. कराड) या दोघांच्या विरुद्ध पिटांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा :
- Prostitution Business In Beed: स्पा सेंटरच्या नावाखाली बीडमध्ये वेश्या व्यवसाय; 3 तरुणींची सुटका
- Prostitution Exposed : बारामती शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
- Raid On Prostitution : बीड तालुक्यातील आणखी एका वेश्या व्यवसायावर धाड, हॉटेल चालकासह तिघांना अटक