महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस असती तर २१ हजार कोटीपैकी १८ हजार कोटी लुटले असते-पंतप्रधान नरेंद्र मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज यवतमाळच्या दौऱ्यावर विविध विकास योजनांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील निधी वाटपावरून टीका केली.

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 6:23 PM IST

Updated : Feb 28, 2024, 7:54 PM IST

नागपूरPM Narendra Modi Yavatmal :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी वाटपावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यावेळी थेट उल्लेख न करता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरदेखील टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "देशातील प्रत्येक कोपरा विकसित करणार आहे. काँग्रेसच्या काळात काय परिस्थिती होती? काँग्रेसच्या काळात लूट होती.काँग्रेस असती तर २१ हजार कोटीपैकी १८ हजार कोटी लुटले असते. दिल्लीतून शेतकऱ्यांना पॅकेज घोषित करण्यात येत होते. त्या पॅकेजमधून लूट झाली. उसाच्या एफआरपीत वाढ केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध योजनांतून ३ हजार कोटी देण्यात आले. देशाचा विकास करण्याचा संकल्प आहे.

ही मोदींची गॅरंटी- "विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून पॅकेज जाहीर व्हायचे, पण मध्येच पॅकेजची लूट व्हायची. त्यातून गरीब, शेतकऱ्यांना आणि आदिवासींना काहीच मिळाले नाही. पण, आज मी एक बटण दाबले. त्यातून पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 21,000 कोटी रुपये कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले. ही मोदींची गॅरंटी आहे.

एनडीएला सर्वाधिक 400 जागा मिळतील-मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला नमन करतो. तसंच मी बाबासाहेब आंबेडकरांनाही नमन करतो. 10 वर्षांपूर्वी मी 'चाय पे चर्चा'साठी यवतमाळला आलो होतो, तेव्हा तुम्ही आशीर्वाद दिला. 2019 मध्येही एनडीएनं लोकसभेत 350 आकडा पार केला. आता, सर्व स्तरातील महिलांचा आशीर्वाद देण्यासाठी येथे आल्या आहेत. लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला सर्वाधिक 400 जागा मिळतील. पुढील 5 वर्षात वेगाने विकास होईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मोदी हे विजयाची हॅटट्रीक करणार आहेत. ही जनतेची गॅरंटी आहे. त्यांनी १० वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. त्यांच्या गॅरंटीमुळे राज्यात विदेशी गुंतवणूक वाढत आहे. मोदींना दाखविलेल्या मार्गावर महाराष्ट्र चालत आहे. तसेच देशाची महासत्तेकडं वाटचाल होत आहे."
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (28 फेब्रुवारी) सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीनं त्यांचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं.

विमानतळावर हे होते उपस्थित-विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यावेळी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॅाप्टरने त्यांनी यवतमाळकडे प्रयाण केले.

हेही वाचा-

  1. पंतप्रधान मोदींची आज यवतमाळमध्ये सभा; मात्र सभास्थळी खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स
  2. 'गगनयान' मोहिमेअंतर्गत चार भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार; पंतप्रधान मोदींची घोषणा
  3. पंतप्रधान मोदी यवतमाळ दौऱ्यावर; २७५ एसटी बसेस सोडल्यानं प्रवासी अन् विद्यार्थ्यांचे होणार हाल
Last Updated : Feb 28, 2024, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details