पुणे PM to inaugurate various projects :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (29 सप्टेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रासाठी 11,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले "आज भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भाविकांना आपुलकीची भेट मिळाली आहे. सोलापूरला थेट हवाई जोडणी देण्यासाठी विमानतळाच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झालं आहे. प्रवाशांसाठी नवीन सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे त्याची गती कमी होऊ नये, यासाठी आपण सक्रिय पावले उचलली पाहिजेत." पुढे पंतप्रधान म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी मला अनेक मोठ्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आणि पायाभरणीसाठी पुण्यात येण्याचे नियोजन होते. परंतु अतिवृष्टीमुळे मला तो कार्यक्रम रद्द करावा लागला. यामुळे माझे नुकसान झाले आहे. कारण पुण्यात आल्यामुळे उत्साह येतो. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेक्शन मार्गावर आता मेट्रो सुरू होणार आहे."
पुणे मेट्रोचं उद्घाटन :पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) शनिवारी (28 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचं उद्घाटन केले. यासह पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (फेज-1) पूर्ण होईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी भागाची किंमत अंदाजे 1,810 कोटी रुपये आहे. पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट ते कात्रज विस्ताराची पायाभरणीदेखील पंतप्रधान मोदी करणार यांनी केली. यासाठी अंदाजे 2,955 कोटी रुपये खर्च येणार आहे. अंदाजे 5.46 किमीचा हा दक्षिण विभाग मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे.