ठाणे Thane Rape Case :महिलेवर अत्याचार करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी बेदम चोप दिला. ही घटना नौपाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली असून पीडितेच्या तक्रारीवरुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. राकेश दामोधर साधवानी असं महिलेवर अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
अश्लील फोटो काढून केलं ब्लॅकमेल :आरोपी राकेश दामोधर साधवानी यानं महिलेवर अत्याचार करुन त्याचे अश्लील फोटो काढले होते. या फोटोवरुन तो पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पीडित महिलेला भेटण्यासाठी शासकीय रुग्णालयात आला. त्यावेळी महिलेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपी राकेश दामोधर साधवानी याला बेदम चोप दिला. त्यानंतर साधवानी याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्रास :नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीला अटक होत नव्हती. म्हणून आरोपी राकेश दामोधर साधवानी हा पीडित महिलेला वारंवार त्रास देत होता. त्यामुळंच कुठंतरी त्रास होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांना झाली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत महिलेची विचारपूस केली. मात्र यावेळी आरोपी महिलेला भेटण्यासाठी रुग्णालयात आला. त्यामुळं नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. "पोलिसांनी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तरी किमान काळजी घ्यावी. आरोपींना वेळेवर अटक करावी, नाहीतर हे प्रकार वारंवार होतच राहतील," असं सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :
- लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; भाजपाच्या माजी नगरसेवकावर बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा
- Thane Crime : लव्ह, सेक्स और धोका: पोलीस असल्याचे भासवून प्रेम; बलात्कार करून पीडितेशी दगाबाजी
- Thane Crime : इंस्टाग्रामवर विद्यार्थींनीशी जुळले सूत, फ्लॅटवर नेऊन अॅसिड टाकण्याची धमकी देत केला बलात्कार