मुंबईCM Eknath Shinde :महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी थेट त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लेटर बॉम्ब टाकला होता. त्या लेटरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपणाला १०० कोटीची वसुली करण्यास सांगतात, असा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रात केला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये जर वसुली केली नाही तर तुम्हाला अटक केली जाईल, अशीही भीती आपणाला दाखवली होती, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर काही खळबळजनक आरोप केले आहेत.
मलाही अडकवण्याचा प्रयत्न :आज माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लवकरच मराठा आरक्षणावर बैठक बोलावण्यात येईल. यावर तोडगा काढण्यात येईल." परमवीर सिंह यांनी महाविकास आघाडीवरत काही गंभीर आरोप केले आहेत, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले "मलाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडकवण्याचा प्रयत्न झाला. ही वस्तुस्थिती आहे. विरोधकांना अडकवण्याचं आणि त्यांना अडचणीत आणण्याचं किंवा त्यांच्यावर केस दाखल करण्याचं समजू शकते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं मी समजू शकतो. परंतु मी तर सत्तेतील सहकारी होतो. तरीसुद्धा मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला."
- योग्य वेळी सविस्तर बोलेल :पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडा केली की, "मला महाविकास आघाडी सरकारमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर मी नंतर सविस्तर बोलणार आहे. सविस्तर भूमिका मांडणार आहेत. परंतु आता यावर काही बोलणार नाही. योग्य वेळी उत्तर देईन.