महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

ETV Bharat / state

आरोग्य खात्याचा 3 हजार 200 कोटींचा महाघोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा सनसनाटी आरोप - Vijay Wadettiwar Allegation

Vijay Wadettiwar On Health Department : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात स्वच्छतेच्या नावाखाली सुमारे 3 हजार 200 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

Vijay Wadettiwar On Health Department
विजय वडेट्टीवार यांचा आरोप (Source - ETV Bharat)

मुंबई Vijay Wadettiwar On Health Department :राज्यातील महायुती सरकारवर विरोधकांकडून वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागात स्वच्छतेच्या नावाखाली 3 हजार 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सदर विभागाचं स्वच्छतेचं टेंडर तत्काळ रद्द करून या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

नेमका आरोप काय? :21 एप्रिल 2022 रोजी स्वच्छतेचं टेंडर काढण्यासाठी शासकीय मान्यता घेण्यात आली. राज्यातील आठ सर्कलमध्ये 27 हजार 869 खाटांना प्रशासकीय मान्यता घेऊन स्वच्छतेच्या घोटाळ्याला सुरूवात झाली. यापूर्वी 77 कोटी 55 लाख 18 हजार रुपये मंजूर झाले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्यात 638 कोटींची वाढ केली. स्वच्छतेच्या अंतर्गत येणारा दर 2022 मधील दर 2023 मध्ये वाढवून दाखवण्यात आला. 2022 मध्ये अंतर्गत स्वच्छता 30 रुपये, बाह्य स्वच्छता 3 रुपये असा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र, 2023 मध्ये अंतर्गत स्वच्छता दर 84 रुपये आणि बाह्य स्वच्छता दर 9 रुपये 40 पैसे असा जाणून बुजून वाढविण्यात आला. ही वाढ 77 कोटींवरून 638 कोटी अशी दहापटीनं करण्यात आली. 60 कोटींची तरतूद असताना नियमांचं उल्लंघन करून टेंडर फुगवण्यात आल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

विजय वडेट्टीवार यांचा आरोप (Source - ETV Bharat Reporter)

उच्चस्तरिय चौकशीची मागणी :सर्वोच्च न्यायालयानं दणका दिल्यानंतर घाईगडबडीत अशा प्रकारचं टेंडर काढण्यात आलं. नवीन टेंडर प्रक्रियेत केवळ बारा जणांनी टेंडर भरलं. मर्जीतल्या लोकांना टेंडर द्यायचं होतं का? सदर प्रक्रियेत मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दबाव आणला का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. राज्यातील 8 आरोग्य उपसंचालकांना केवळ मर्जीतल्या कंपन्यांना काम देण्यासंदर्भात हा दबाव होता, असाही दावा त्यांनी केला. सदर विभागाचं स्वच्छतेचं टेंडर तत्काळ रद्द करून प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलीय.

लाडक्या बहिणींच्या मनात सरकारविरोधात चीड : लाडक्या बहिणींकडून मतं मिळविण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. मात्र, लाडक्या बहिणींच्या मनात सरकारविरोधात किती चीड आहे, हे मंत्रालयात घुसून लाडक्या बहिणीनं दाखवून दिलय. आपल्याला सुरक्षित वाटत नसल्यानं हा प्रकार त्या महिलेकडून घडला असावा, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. महायुतीत भाजपाला अजितदादांचा 'राष्ट्रवादी' ठरतोय डोईजड; आता फडणवीस म्हणतात... - BJP Displeasure With NCP
  2. एम सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या : MUDA घोटाळ्यात दाखल झाला गुन्हा - FIR Against CM Siddaramaiah
  3. विधानसभा निवडणूक 2024: एकनाथ शिंदेंची शिवसेना ठाकरेंचा 'मुंबई' बालेकिल्ला करणार काबिज ? जाणून घ्या शिंदे गटाचं टार्गेट काय? - Assembly Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details