महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोअर परळच्या नवीन पुलावर आठ दिवसात झाला दुसरा अपघात, एकाचा मृत्यू - Mumbai Accident - MUMBAI ACCIDENT

Mumbai Accident : भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. मुंबईतील लोअर परळ येथील नवीन ब्रिजवर रविवारी दुपारी ही घटना घडली.

one died and two injured after speedy car hit two wheeler in lower parel
लोअर परळ अपघात (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 8:08 PM IST

Updated : Sep 8, 2024, 10:53 PM IST

मुंबई Mumbai Accident : मुंबईतील लोअर परळ येथील नवीन ब्रिजवर कारनं दुचाकीला धडक दिल्यानं एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ना म जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कार चालक मनीष सिंगला ताब्यात घेण्यात आलं आहे.


यापूर्वीही झाला होता अपघात :दोन ते तीन दिवसांपूर्वीच लोअर परळ पुलावर सिमेंट मिक्सरच्या मागच्या टायरखाली आल्यानं एका तृतीयपंथीचा मृत्यू झाला होता. आज झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघं गंभीर जखमी झाले आहेत. कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेत आयुष सिंह (वय 20) नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर शिवम सिंह (वय 22) आणि विशाल सिंह (वय 21) हे दोघं जखमी झाले आहेत. हे तिघंही वरळीचे रहिवासी असून ट्रिपल सीट दुचाकी चालवत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.


आरोपीवर गुन्हा दाखल : आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास नवीन लोअर परेल ब्रिज येथून टाटा कंपनीची कर्व इलेक्ट्रीक कार क्रमांक एमएच 01-टि.सी.-089-05 सेनापती बापट मार्गाच्या दिशेनं जात असताना मातुल्य नाका, सिग्नल चौकात उजव्या बाजूस वळण घेत असलेल्या सुझुकी कंपनीची अ‍ॅक्सेस क्रमांक एमएच 02 एफएफ 9678 या दुचाकी वाहनाला जोराची धडक झाली. या घटनेनंतर कारचा चालक मनिष चंद्रभान सिंग (वय 25) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

हेही वाचा -

  1. बसची टेम्पोला जोरदार धडक; अपघातात 15 जणांचा मृत्यू, तेराव्याचा कार्यक्रम आटोपून परतत होते घरी - Bus Tempo Road Accident
  2. मुंबई पुन्हा हादरली ;भरधाव कारनं घेतला महिलेचा बळी, जमावानं कार चालकाला बेदम चोपलं - Mumbai Hit And Run
  3. दहीहंडीचं बक्षीस जिंकल्यानं सेलिब्रेशन केलं, पिकनिकवरुन परतणाऱ्या दोघांना कंटेनरनं चिरडलं - Two Killed Container Accident
Last Updated : Sep 8, 2024, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details