मुंबईMaratha Reservation :उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असतानाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय. आज झालेल्या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं बेमुदत उपोषण सुरूच आहे.
मुख्यमंत्र्यांनी पोस्ट करत दिली माहिती :मनोज जरांगे-पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत सग्या-सोयरांना कुणबी जातीचा दाखला तत्काळ देण्यात येणार असून, शासनानं पुढील अधिसूचना जारी केली आहे. मात्र त्याचं कायद्यात रूपांतर करून एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत. यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही विशेष अधिवेशन घेण्याबाबत चर्चा झाली आहे. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यास मान्यता देण्यात आली. 20 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत याची महिती दिली आहे.