महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकारणात कुणाच्याच शब्दाची आजची गॅरंटी उद्या टिकत नाही, उद्धव ठाकरेंच्या एनडीएसोबत जाण्यावर चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले - Chandrakant Patil - CHANDRAKANT PATIL

Chandrakant Patil : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भविष्यात एनडीए सोबत जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, राजकारणामध्ये आज आपण जे बोलू तेच उद्या करू याची गॅरंटी नसते. अर्थातच त्यांनी उद्धव ठाकरे हे भविष्यात एनडीए सोबत जाऊ शकतात हे संकेत दिले आहेत.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 7:33 PM IST

कोल्हापूर Chandrakant Patil :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हणावं आणि त्यांनी काय निर्णय घ्यावा हा माझा विषय नाही. त्यांना वाटलं असेल की, पुन्हा एनडीएमध्ये जाऊ नये; पण राजकारणामध्ये आज आपण जे बोलू तेच उद्या करू याची गॅरंटी नसते. दिशाभूल करून खोटे नरेटिव्ह सेट करून मतं मिळवण्याचा प्रयत्न झाला; मात्र हे फार काळ चालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या मालाला बरा भाव मिळवून दिला. त्यांचे आभार मानत असल्याचं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंवर बोलताना (ETV Bharat Reporter)

शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही :गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी दिलेलं आरक्षण सरकार गेल्यानंतर कोर्टात टिकलं नाही. यावेळी आपण अभ्यास करून दहा टक्के आरक्षण दिलंय. गेल्या वेळी ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवारांची राजकारणातील 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी 50 वर्षांत सल्ला दिला. ते राजकारणाच्या केन्द्रबिंदूमध्ये होते. मग त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात निर्णय का घेतला नाही? राजकीय स्वार्थापोटी समाजाचे तुकडे तुकडे पाडले जात आहेत, हे बरोबर नाही. अनेक संत महंतांनी समाज एकत्र राहावा यासाठी प्रयत्न केले आहेत. काही जणांनी राजकीय स्वार्थासाठी तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. राजकारण्यांनी आगीत तेल टाकण्याचं काम करू नये. कारण, तुम्ही देखील यात भस्म व्हाल. समाजाला हे कळलं पाहिजे की राजकीय स्वार्थासाठी हे करत आहेत, असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारनं यावर नोटिफिकेशन काढावं :मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आपण सगळे भांडू, चर्चा करू आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडू; पण आत्महत्या करू नका. जातपडताळणीमध्ये हे खातं पैसे खाऊन जातीचं प्रमाणपत्र दिलं जातय. ब्लड रिलेशनमध्ये बसणाऱ्या कोणालाही जात पडताळणी करण्याची गरज नाही. यामध्ये काही 'खुट' मारून ठेवली आहे. वडिलांना दिलं म्हणजे मुलाला तातडीनं प्रमाणपत्र दिलं पाहिजे; मात्र 3 आठवड्याची नोटीस लावली जाते ती कशासाठी? रक्तसंबंध कायदा आणि सगेसोयरे यामध्ये काहीही फरक नाही. रक्तसंबंध आणि सगेसोयरे हा एकच शब्दच आहे, हे आम्ही पटवून देणार आहोत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारनं नोटिफिकेश काढलं आहे. आता जरांगे पाटील यांना नेमकं काय पाहिजे हे पाहिलं पाहिजे. समाजाचं भलं कशात आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे.

शक्तीपीठ महामार्गाचा विषय संपला :राज्यात शक्तीपीठ या विषयामध्ये आम्ही भूसंपादन करणार नाही हे सरकारनं ठरवलं आहे. त्यामुळे हा विषय संपला आहे. काही लोक आंदोलनं चालू ठेवायची असं मत मांडत आहेत; मात्र याला काही अर्थ नाही. 2020 साली जी पदवीधर निवडणूक झाली त्यामध्ये साडेसात हजार असे मतदार सापडले जे पदवीधर नाहीत. या संदर्भात सुप्रीम कोर्टात निर्णय चालू आहे. आमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. कोल्हापूर असेल किंवा राज्यात कुठेही महायुतीतल्या कोणत्याही पक्षाने कमी काम केलं असा ठपका ठेवलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठपका ठेवलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे करोडो स्वयंसेवक आहेत, त्यातील एकानं मत मांडलं म्हणजे ते संघाचं मत नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

हेही वाचा:

  1. पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, मुंबई शहर आणि पूर्व उपनगराला होणार कमी दाबानं पाणीपुरवठा - BMC Water Supply Disrupted
  2. मुंबई, संभाजीनगरासह राज्यात ठिकठिकाणी रामोजी राव यांना श्रद्धांजली; तर नागपुरात जगप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी आदरांजलीच्या प्रसादासाठी केला हलवा - Tribute to Ramoji Rao
  3. १४ कोटी रुपयांचं गव्हर्मेंट शेअर्स फसवणूक प्रकरण; आरोपीच्या कोलकात्यातून आवळल्या मुसक्या - Government Shares Case

ABOUT THE AUTHOR

...view details