मुंबईPrasad Pujari : कुख्यात गुंड प्रसाद पुजारीला आता आणखी एका गुन्ह्यात अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे. उद्या म्हणजेच बुधवारी खंडणी, खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात प्रसाद पुजारीची आरसीएफ पोलिस ठाण्यातील पोलीस कोठडी संपली असून तिसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक होणार आहे.
बाफना दिली धमकी : या प्रकरणात प्रसाद पुजारीनं परदेशातून तक्रारदार बाफना यांना कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. बाफना तसंच एका व्यक्तीचा वाद होता. या वादात प्रसाद पुजारी पडला. त्यानं प्रकरण मिटवण्यासाठी बाफना यांना फोनवरून धमकावलं होतं. याप्रकरणी 2020 मध्ये लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तिसऱ्या गुन्ह्यात अटक :मुंबईत प्रसाद पुजारीविरोधात एकून आठ गुन्हे दाखल असून त्यापैकी दोन गुन्ह्यात प्रसाद पुजारीला अटक दाखवली आहे. तसंच उद्या त्याला आणखी तिसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. मात्र प्रसाद पुजारीबाबत पोलिसांनी मोठा खुलासा करत पुजारीची कर्नाटकातील उडिपी या जिल्ह्यात 11 एकर जमीन आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. कर्नाटकातील उडिपी येथील मूळगावी प्रसाद पुजारीनं 11 एकर जमीन खरीदी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. येत्या काही दिवसांत मुंबई पोलीस ही मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी दत्तात्रय नाळे यांनी दिली. मात्र, हि जागा कोणाकडून, कधी आणि किती किंमतीला घेतली होती याबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
चीनमधील प्रत्यार्पणनंतर गोळीबार प्रकरणात अटक : चीनमधील प्रत्यार्पणनंतर प्रसाद पुजारीला विक्रोळी परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आली होती. विक्रोळी येथील व्यापारी चंद्रकांत जाधव यांच्यावर प्रसाद पुजारीच्या साथीदारांनी 19 डिसेंबर 2019 रोजी गोळीबार केला होता. या प्रकरणी कलम 307, 452 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रसाद पुजारीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सहआयुक्त लखमी गौतम यांनी दिली होती. या प्रकरणी विशेष मोक्का न्यायालयानं 2019 मध्ये 7 जणांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुजारी याला आरसीएफ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली होती. आता त्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या धमकीच्या उन्हात उद्या अटक करण्यात येणार आहे.