महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊतांबाबत बदनामीकारक विधान, भाजपा आमदार नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी - नितेश राणे संजय राऊत

Nitesh Rane Warrant : भाजपा आमदार नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झालंय. ते संजय राऊतांबाबत केलेल्या कथित बदनामीकारक व्यक्तव्यासंदर्भातील खटल्याला उपस्थित न राहिल्यामुळे हे वॉरंट जारी करण्यात आलंय.

Nitesh Rane
Nitesh Rane

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 10:44 PM IST

मुंबई Nitesh Rane Warrant :भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्याबाबत गेल्या वर्षी कथित बदनामीकारक विधान केलं होतं. त्या संदर्भात संजय राऊत यांनी माजगाव दंडाधिकारी न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीस नितेश राणे उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. त्यामुळे आता पुढील सुनावणीस नितेश राणे हजर न राहिल्यास त्यांच्या अटकेची शक्यता आहे.

नितेश राणेंचं विधान काय होतं : संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. हे विधान म्हणजे माझी सार्वजनिक बदनामी असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संजय राऊत यांच्या याचिकेनुसार, "महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा 10 जून पूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील", असा सार्वजनिक दावा नितेश राणे यांनी केला.

...तर नितेश राणेंना अटक होऊ शकते : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं होतं. या संदर्भात संजय राऊत यांनी तक्रार देखील दाखल केली होती. या प्रकरणी माजगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आलाय. 21 दिवसानंतर जर नितेश राणे न्यायदंडाधिकारी न्यायालयत हजर राहिले नाहीत, तर त्यांना अटक होऊ शकते. असं अजामीनपात्र वॉरंट न्यायाधीश संग्राम काळे यांनी जारी केलंय.

हे वाचलंत का :

  1. मग असं बोलताना राऊतांना लाज कशी वाटत नाही? नितेश राणेंचा राऊत कुटुंबावर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details