मुंबईSachin Waje Demand :अँटलिया स्फोटके प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं तुरुंगातून पुस्तक लिहू द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी मान्य केल्यास इतर अनेक दहशतवादी आरोपाखालील आरोपींचेदेखील फावणार, असं म्हणत या मागणीला तुरुंग प्रशासनाकडून आक्षेप घेतला गेला. त्यामुळे राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 16 फेब्रुवारी रोजी ही मागणी अमान्य केली.
यामुळे वाझेची मागणी फेटाळली:आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा 'अँटलिया' या मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी तसेच व्यापारी मनसुख हिरेन खून प्रकरणात आरोपी आहे. तो सध्या तळोजा तुरुंगामध्ये आहे. त्याने तुरुंगात राहूनच "जिंकून हरलेली लढाई" हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रशासनाकडं परवानगीचा अर्ज केला होता. मात्र, उद्या कोणत्याही दहशतवादी आरोपाखालील आरोपी अशी परवानगी मागेल. यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असं म्हणत तुरुंगातून पुस्तक लिहिण्याच्या परवानगीला आक्षेप घेतलेला होता. प्रशासनाकडून जोरदार आक्षेप घेतला गेला. त्यात तथ्य आढळल्यामुळे न्यायालयानं सचिन वाझेची मागणी फेटाळून लावली.