महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रात एटीएस, एनआयएची मोठी कारवाई; छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालन्यातून तिघांना घेतलं ताब्यात - NIA and ATS Raid In Maharashtra

एनआयए आणि एटीएसनं आज (5 ऑक्टोबर) पहाटेपासून विविध भागात कारवाई सुरू केलीय. यात आत्तापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

NIA and ATS action in Maharashtra, one person detained for investigation from Jalna
महाराष्ट्रात एटीएस, एनआयएची कारवाई (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 9:37 AM IST

Updated : Oct 5, 2024, 9:56 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :एनआयए आणि एटीएस यांच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात छापेमारी करत संशयित युवकांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्रीपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर येथील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्यानं ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

तिघं ताब्यात :एनआयए आणि एटीएस यांच्या माध्यमातून राज्यभर धाडसत्र करण्यात आलं. यात तीन जिल्ह्यात एकाचवेळी करण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक मालेगाव या भागांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आझाद चौक आणि एन 6 या भागातून दोन जणांना तर जालना जिल्ह्यातील गांधीनगर या भागातून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारवाई झालेल्या ठिकाणी शनिवारी सकाळपर्यंत पंचनामे करण्याची कारवाई सुरू होती. तसंच सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडं असलेले दस्तऐवज, मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी केली जात आहे.

याधीही शहरात झाली होती कारवाई :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या अगोदरही अनेकवेळा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या युवकांना ताब्यात घेण्यात आलय. इतकंच नाही तर काही वर्षांपूर्वी हिमायत बाग येथे एटीएसनं दहशतवाद्याचं एन्काऊंटर देखील केलं होतं. या पार्श्वभूमीवर हे शहर संवेदनशील समजलं जातं. त्यामुळंच दहशतवाद्यांचे स्लीपर सेल या शहरात सुरू आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय.

Last Updated : Oct 5, 2024, 9:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details