महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नी पत्नीच्या भांडणात पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी; निर्दयी बापानं पोटच्या मुलीला आपटलं जमिनीवर - Crime News - CRIME NEWS

New Mumbai Crime News : पती पत्नीत झालेल्या भांडणामुळं रागाच्या भरात जन्मदात्या बापानंच पोटच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला जमिनीवर आपटल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील उरण परिसरात समोर आलीय.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र (Etv Bharat Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 10:43 PM IST

नवी मुंबई New Mumbai Crime News : पती पत्नीत झालेल्या भांडणामुळं रागाच्या भरात जन्मदात्या बापानंच पोटच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला जमिनीवर आपटलं, यात डोक्याला मार लागून दुर्दैवानं चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईतील उरण परिसरात समोर आलीय. याप्रकरणी नवी मुंबई परिमंडळ 2 च्या उरण पोलिसांनी नराधम बापाला अटक केलीय.

काय आहे प्रकरण : उरण तालुक्याच्या बोकडविरा येथील एका निर्दयी बापानं आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला जमिनीवर आपटलं. यात संबधित मुलीचा मृत्यू झालाय. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. नवी मुंबई परिमंडळ 2 च्या उरण पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या बोकडविरा गावात खुशीराम ठाकूर (25) व त्याची पत्नी अमृता खुशीराम ठाकूर (21) हे दांपत्य त्यांच्या पाच महिन्याच्या मुलगीसोबत राहत होतं. खुशीराम व अमृताचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. खुशीरामला दारुचं व्यसन असल्यानं तो नेहमीच दारु पिऊन त्याची पत्नी अमृताला मारहाण करायचा. त्यामुळं दररोज दोघांमध्ये भांडणं होत होती. अमृता व तिचा पती खुशीराम यांच्यात रविवारीही दुपारच्या सुमारास भांडण झालं होतं. त्यामुळं अमृता तिच्या पाच महिन्याच्या मुलीला घेऊन शेजारी राहात असलेल्या तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली. मात्र, आपली पत्नी मुलीला शेजारी घेऊन गेली याचा राग खुशीरामला आल्यानं अमृताच्या मागे जाऊन ‘हमारी लडकी दे दो’ असं बोलत मुलगी घेण्यावरुन भांडण सुरु केलं. मात्र आपल्या दारुड्या पतिकडं पाच महिन्याच्या मुलीला देण्यास अमृतानं विरोध केला. यामुळं खुशीरामने मुलीला तिच्या ताब्यातून हिसकावून घेतलं व जमिनीवर आपटलं. यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यात ती मरण पावली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल, नराधम बापाच्या आवळल्या मुसक्या :या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी खुशीराम ठाकूर याला ताब्यात घेतलं. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत. पाच महिन्यांच्या चिमुकलीला जमिनीवर आपटून जखमी केल्यानं खुशीराम ठाकूरवर कलम 308 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं कलम 304 (2) अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं उरण पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, राजेंद्र कोते यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. अभिनेत्री नूर मालविका दासचा फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह, पोलीस चौकशी सुरू - Noor Malabika Das Dies
  2. विक्रोळीत मुसळधार पावसामुळं इमारतीचा स्लॅब कोसळला; बाप-लेकाचा मृत्यू - Mumbai Vikhroli News

ABOUT THE AUTHOR

...view details