मुंबई Nepal Bus Accident News : नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या बस अपघातातील मृत्यू झालेल्या 24 प्रवाशांचे मृतदेह उद्या महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. हे 24 मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानानं आणले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आपत्ती निवारण आणि पुनर्वसन विभागाचा कार्यभार आहे. नेपाळमधील दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीतील इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. महाराष्ट्रातील प्रवाशांचे मृतदेह परत आणण्यासाठी समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्तक्षेपामुळे भारतीय हवाई दलाच्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे विमान शनिवारी मृतदेह उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात घेऊन येणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
नेपाळमध्ये नदीत कोसळल्यानं 24 जणांचा मृत्यू झाला. आम्ही दिल्लीतील दूतावासाशीही संपर्क साधला आहे. नेपाळ सैन्यदलानं जखमींना जणांना रुग्णालयात हलवले आहे. आमच्याकडे अचूक आकडा नाही. आम्ही सतत सरकारच्या संपर्कात आहोत-मंत्री गिरीश महाजन
पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोकनेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 24 जणांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातातील मृतदेह तातडीनं महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाल्याचं पंतप्रधान मोदींनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधानांनी पोस्टमध्ये म्हटले, " जखमी लवकरात लवकर बरे होवोत. भारतीय दूतावास बाधितांना शक्य ती मदत करत आहे."
- स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदत आणि बचाव कार्य राबविण्यात आलं. दूतावासाचा आपत्कालीन मदत क्रमांक आहे: +977-9851107021.
- स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार बस अपघातानंतर नेपाळच्या पर्यटनालाही मोठा फटका बसणार आहे. या अपघातानंतर नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा -
- नेपाळमध्ये नदीत बस कोसळून जळगावमधील 27 यात्रेकरुंचा मृत्यू, रक्षा खडसे उद्या जखमींची घेणार भेट - Indian Bus Plunges River in Nepal