महाराष्ट्र

maharashtra

नीट-पीजी परीक्षेतही हेराफेरी? 15 हजार विद्यार्थी संशयास्पद; आरोपींच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर - NEET Paper Leak Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 12:41 PM IST

Updated : Jul 3, 2024, 12:53 PM IST

NEET Exam Scam : नीट घोटाळा प्रकरणी मागील दहा दिवसांपासून लातूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये 'नीट' परीक्षेबरोबरच 'पीजी नीट' परीक्षेचंही प्रवेश पत्र सापडलं आहे. या परीक्षेतही हेराफेरी झाल्याचा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

NEET Exam Scam
NEET Exam Scam (Source - ETV Bharat)

लातूर NEET Exam Scam :नीट घोटाळा प्रकरणी मागील दहा दिवसांपासून लातूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संजय जाधव आणि जलील पठाण या दोन आरोपींनी नीट परीक्षेसह अन्य परीक्षांमध्येही हेराफेरी केल्याची माहिती समोर आली. यामध्ये आणखी काही आरोपी सहभागी असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव या दोघांच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील उमेश तोडकर, राजेश उप्पलवार, डोंगरे यांची नावं समोर आली आहेत.

व्हाट्सअप चॅटिंगवरून धक्कादायक माहिती समोर :मागील 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत समोर आलेली माहिती मंगळवारी सीबीआयनं न्यायालयात सांगितली. यात लातूर शहरातील बार्शी रोडवरील पाण्याचे टाकीजवळ उमेश तोडकर आणि डोंगरे या व्यक्तींमध्ये सौदा झाल्याचं समोर आलं आहे. तोडकर आणि आरोपी संजय जाधव यांच्यातील व्हाट्सअप चॅटिंगवरून काही बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये तोडकर यानं काही प्रवेशपत्र आरोपी जाधवच्या व्हाट्सअपवर पाठवलेली आहेत. यामध्ये तोडकरनं "याला किती पैसे लागतील?" अशी विचारणा केली. त्याला जाधवनं उत्तर म्हणून "आधी प्रवेश पत्र पाठवा. पैसे मी नंतर सांगतो" असं म्हटलं आहे. तसेच आरोपी जलील पठाण याला राजेश उप्पलवार या व्यक्तीनं वारंवार पैसे पाठवले आहेत. आरोपी पठाणच्या मोबाईलवरून राजेश उप्पलवार याच्याशी अनेक संवाद झालेले आहेत. आता उमेश तोडकर, राजेश उप्पलवार, डोंगरे सर हे कोण आहेत? याचा शोध सीबीआयचे अधिकारी करत आहेत. आरोपी जाधव आणि पठाणला न्यायालयानं 6 जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

पीजी नीट परीक्षेतही हेराफेरी :आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र सापडली आहेत. या विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये जावून नीट परीक्षा दिल्याचं उघड झालं आहे. संशयीत असलेल्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना 600 गुण मिळालेले आहेत. अशा संशयास्पद विद्यार्थ्यांचा आकडा आता 15 हजारावर गेल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपी संजय जाधव, जलील पठाण यांचं बँक खातं सीबीआयनं तपासल्यानंतर 10 विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रे आणि 3 लाख रुपये पठाणनं जाधवला पाठवल्याचं समोर आलं आहे. प्रवेश पत्र आणि पाठवलेली रोकड याचं कनेक्शन काय ? याचा तपास सीबीआयचे अधिकारी करत आहेत. त्यामुळं सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा लातूरातील मुक्काम आता वाढला आहे. न 6 जुलैपर्यंत सीबीआयचे अधिकारी नीट घोटाळ्याचा चौफेर तपास करणार आहेत.

हेही वाचा

  1. एमबीबीएस करुन डॉक्टर व्हायचं; मग ही बातमी आहे खास तुमच्यासाठी, जाणून परदेशात कशा आहेत एमबीबीएस प्रवेशाच्या संधी - MBBS Admission Guidance Seminar
  2. सीबीआय नीट पेपर फुटीतील मुख्य सूत्रधार इरान्ना कोंगुलवारच्या घराची घेणार झडती; हाती लागणार मोठं घबाड? - Latur NEEt Exam Scam
  3. लातूरच्या 'नीट' घोटाळ्याचा तपास सीबीआयकडं वर्ग, दोन आरोपी अजूनही फरार, कसून शोध सुरू - NEET Exam Scam
Last Updated : Jul 3, 2024, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details