महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारनं विदर्भातील जनतेला न्याय दिला, नीलम गोऱ्हे यांच्याकडून सरकारच्या कामांची माहिती - Neelam Gorhe Mumbai PC - NEELAM GORHE MUMBAI PC

Neelam Gorhe : सरकारनं जाहीर केलेली पूर्व विदर्भातील लोकहिताची कामं ही मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारनं विदर्भातील जनतेला न्याय दिला असल्याचंही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

Neelam Gorhe
नीलम गोऱ्हे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 10:43 PM IST

मुंबईNeelam Gorhe: "राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भात लोकसभेची निवडणूक होत आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरू आहे. महाराष्ट्रात विविध विकासकामं होत आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत होत असून लवकरच एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होण्याकडं वाटचाल सुरू आहे," असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज (7 एप्रिल) मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या लोकहिताच्या कामांची माहिती दिली.

उमेदवार लवकरच जाहीर होतील :"विदर्भात सरकारकडून लोकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दुष्काळी भागात सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न केला. महिला बचत गट यांना सरकारकडून प्राधान्य मिळत आहे. महायुतीतील शेवटच्या टप्प्यातील जे उमेदवार आहेत ते लवकरच जाहीर होतील," असं यावेळी गोऱ्हे यांनी म्हटलं. तसेच "सरकारने मागील दोन ते अडीच वर्षांत अनेक सकारात्मक कामे केली तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. निवडणुकीच्या तोंडावर सरकारची ही सकारात्मक कामे लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न आहे. राज्याचे नवे खनिज धोरण अंतिम टप्प्यात आहे. त्याचा विदर्भाला मोठा लाभ होणार आहे. तसेच सुरजागड येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटींचे दोन नवीन प्रकल्प आणि स्टील प्लांटही उभारणार आहे. त्यातून १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे," असं गोऱ्हे यांनी सांगितलं.


१० हजार रोजगारनिर्मिती : "चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कोळसा खनिजावरील आधारित Coal Gasification द्वारे हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा प्रकल्पात २० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यातून १० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे," अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली. तसेच ⁠"विदर्भात ११ जिल्ह्यात २५१७ मेगावॉट MW पवन उर्जा प्रकल्प उभारणीस वाव आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ- मराठवाडा असे तीन टुरिझम सर्किट तयार करणार आहे," असंही गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.


धानाला दुप्पट बोनस :"विदर्भ-मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनसाठी मूल्यसाखळ्या विकसित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर धानाला दुप्पट बोनस यातून ६ लाख शेतकऱ्यांना १४०० कोटी मिळणार आहेत. तसेच पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग-८६ हजार ३०० कोटी. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी वाशीम तालुक्यात पेनगंगा नदीवर ११ बैरेजेस बांधण्यात आले आहेत. ⁠वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ८३ हजार ६४६ कोटी खर्च येणार आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी १५०० कोटी खर्च करण्यात आले. तसेच सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी निधी देण्यात आला," असं गोऱ्हे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. 'आम्ही ग्राऊंडवर काम करणारे कार्यकर्ते, ठाकरे यांना टीका करण्यापेक्षा दुसरे काही काम आहे का?'; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  2. राज्यातील राजकीय संस्कृती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच घसरली; रोहित पवारांची टीका - Rohit Pawar PC
  3. एकनाथ खडसे करणार भाजपा प्रवेश; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details