महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांची खेळी; शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याअगोदर 'कॅव्हेट' दाखल

NCP Political Crisis : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पक्षाचं चिन्ह आणि नाव बहाल केल्यानंतर आता शरद पवार गट या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. त्यापूर्वी अजित पवार गटानं याप्रकरणी औपचारिकपणे कॅव्हेट दाखल केलं.

NCP Political Crisis
NCP Political Crisis

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 2:11 PM IST

नवी दिल्ली NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादावर निवडणूक आयोगानं आपला निर्णय दिला असला, तरी शरद पवार गटाला तो मान्य नाही. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडं, अजित पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या वतीनं कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. याचाच अर्थ न्यायालय जेव्हा जेव्हा या खटल्याची सुनावणी करेल, तेव्हा त्यांची बाजू जाणून घेऊनच निकाल देईल.

निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दणका : काल (6 फेब्रुवारी) निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दणका देत अजित पवार गटच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल दिला. या निर्णयामुळे अजित पवार गटाला पक्षाचं निवडणूक चिन्हही मिळालं आहे. याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "ते पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह हिसकावून घेऊ शकतात, मात्र माझं मनोबल नाही. आपण आपला लढा सुरूच ठेवणार असून पुन्हा पक्षाला आणखी उंचीवर नेणार आहे," असं त्यांनी सांगितलं.

आयोगाच्या निर्णयाचा विरोध : निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाच्या समर्थकांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाजवळ अनेक पोस्टर्स लावले. या पोस्टर्सच्या माध्यमातून अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना टोला लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू होता. गेल्या वर्षी 2 जुलैला अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार त्यांच्यासोबत आले. अजित पवार गट आता एनडीएचा भाग झाला आहे आणि तो राज्यातील सत्ताधारी पक्षाचा भागीदार आहे.

हे वाचलंत का :

  1. २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
  2. राष्ट्रवादी अजित पवारांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय आहेत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया?
  3. निवडणूक आयोगाचा निर्णय हा महाराष्ट्राविरुद्ध कट रचणाऱ्या ‘अदृश्य शक्ती’चा विजय- सुप्रिया सुळे

ABOUT THE AUTHOR

...view details