महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्यावर मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोला मायलेकींनी दिला चोप; पाहा व्हिडिओ - Nashik News - NASHIK NEWS

Mother Daughter Beaten Road Romeo : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असताना नाशिकमध्ये 'तूच हो तुझी संरक्षक' हा मंत्र अजमावत मायलेकींनी छेड काढणाऱ्या चार टवाळखोरांना चांगलाच चोप दिलाय. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Nashik News mother and daughter beaten road romeo, CCTV video goes viral on social media
नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोला मायलेकींनी दिला चोप (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 2:41 PM IST

नाशिक Mother Daughter Beaten Road Romeo :कोलकाता आणि बदलापूर घटनेनंतर जनमानसात तीव्र संताप असताना, नाशिकमध्ये महिलांची छेड काढणाऱ्या चार रोडरोमियोंना मायलेकींनी भरस्त्यात चोप देत टवळखोरांची चांगलीच मस्ती जिरवली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर नाशिककर या मायलेकींचं कौतुक करत आहेत.

नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोला मायलेकींनी दिला चोप (ETV Bharat Reporter)

नेमकं काय घडलं :नाशिक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चोऱ्या, खून, मारामारी, सोनसाखळी चोऱ्या, यासह रोड रोमियोच्या त्रासानं नागरिक हैराण झाले आहे. अशात गुरुवारी (29 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास नाशिकच्या पवननगर भागातील एक महिला हेडगेवार चौकातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात येत होती. त्यावेळी बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली. सुरुवातीला महिलेनं याकडं दुर्लक्ष केलं. मात्र, पुन्हा या टवाळखोरांनी छेड काढल्यानंतर तिचा संताप अनावर झाला. महिलेनं या टवाळखोरांना विचारणा केली. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. यादरम्यान महिलेची मुलगी आणि तिची मैत्रीणही दुचाकीवरून तिथं आली. आईची छेड काढल्याचं समजताच मुलीनं तेथील एका टवाळखोराच्या कानशिलात लगावली. तसंच त्यांनी बाजूनं जात असलेल्या भंगारच्या गाड्यावरून खुर्ची उचलत या टवाळखोरांना चांगलंच चोपून काढलं. या रणरागिनींचं रुप बघून टवाळखोर तिथून पळून गेले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. महिलांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडं मात्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

पोलीस गस्त वाढवली : चारही टवळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. महिला सुरक्षेबाबत नाशिक पोलीस जागरुक असून या अनुषंगानं अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त वाढवण्यात आलीय. टवाळखोरांबाबत महिलांना त्रास असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. अल्पवयीन लेकीवर अत्याचार करतानाचा बापानं काढला व्हिडिओ; आईनं बघितला अन्.... - Sexual Assault Of Minor Girl
  2. "लग्न केलं नाहीस तर घरच्यांना सोडणार नाही"; तरुणाच्या जाचाला कंटाळून 15 वर्षीय मुलीनं संपवलं जीवन, दहा जणांवर गुन्हा दाखल - Minor Girl Suicide Nashik
  3. नाशिकमध्ये एटीएसची कारवाई; स्पासह ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोर महिलांसह तिघांना अटक - bangladeshi nationals arrest

ABOUT THE AUTHOR

...view details