महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुतारीच्या उमेदवारानं मुतारीचा केला घोटाळा; भाऊ नेमकं प्रकरण काय हाय रं? - APMC toilet scam - APMC TOILET SCAM

Narendra Patil on Shashikant Shinde : नवी मुंबई शेती उत्पन्न बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील तुतारीचा उमेदवार मुंबईत शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीत घोटाळा करतो, हे लांच्छनास्पद असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 6:15 PM IST

Updated : Apr 15, 2024, 8:12 PM IST

नरेंद्र पाटील विरुद्ध शशिकांत शिंदे

सातारा Narendra Patil on Shashikant Shinde : नवी मुंबई शेती उत्पन्न बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. साताऱ्यातील तुतारीचा उमेदवार नवी मुंबई उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीत घोटाळा करतो, हे लांच्छनास्पद असल्याचा टोला नरेंद्र पाटलांनी लखावला आहे.

मागील निवडणुकीत माझ्याविरोधात कटकारस्थान : कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना नरेंद्र पाटील म्हणाले की, "2019 ला शशिकांत शिंदेंनी मला बेंबीच्या देठापासून विरोध केला. आमच्या विरोधात जे काही कटकारस्थान केलं. माथाडी परिवारात काम करताना आम्ही आणि आमच्या कुटुंबांने त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाच्या दृष्टीकोनातून काम केलं. परंतु, 2019 ला त्यांनी ज्या पध्दतीने आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात जे काही कटकारस्थान केलं. त्याचं रिटर्न गिफ्ट देण्याची संधी आली आहे. निवडणुकीला अजून बराच काळ बाकी आहे. त्या-त्या वेळी आपण आणखी उलगडा करणार."

माझ्यावर टीका करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यात अजुन एक भर पडली आहे. जे काही आरोप केले आहेत, ते पूर्ण राजकीय आहेत. ज्या मुतारीच्या विषयावर ते बोलत आहेत, त्यामध्ये ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची कुटुंबे कोणी षडयंत्र केलं, ते समोर येऊन सांगायला तयार होतील. नरेंद्र पाटलांना सत्तेवर बसवताना मी त्यांना सहकार्य केलेलं आहे. टीका करणाऱ्यांना माथाडी कामगार उत्तर देतील. आण्णासाहेबांचे चिरंजीव असल्याने मी त्यांचा आदर ठेवेन. त्यांना कुणी तरी टीका करायला सांगितलं असेल - आमदार शशिकांत शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार

माथाडींचा खरा नेता कोण, ते वेळच सांगेल : "खरा माथाडी कामगार कुणाच्या पाठीशी आहे आणि राज्याचा कोणता नेता माथाडींचे प्रश्न सोडवतो, हे वेळ आल्यानंतर कळेल. माथाडींच्या प्रश्नांकडे त्यांनी कधी गांभीर्याने पाहिलं नाही. त्यांनी माथाडींचे प्रश्न मार्गी लावले नाहीत. त्यामुळे माथाडींचा खरा नेता कोण, हे वेळच सांगेल. माथाडी कामगारांचे प्रश्न देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सोडवत असतील तर माथाडींमध्ये फूट कोणी पाडली?" असा सवाल त्यांनी शशिकांत शिंदेंना उद्देशून केला.

चुकीचं काही केलं नसेल तर जामीन का घेतला? : "निवडणुकीत विरोधक आणि उमेदवारामध्ये गोळाबेरीज होत असते. त्यांनी जर काहीच केलं नसेल तर त्यांना घाबरायची गरज नाही. परंतु, मग मुतारीच्या घोटाळ्यात त्यांनी जामीन का घेतला, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केला. उलट ही निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदरच एफएसआयचा नवीन गुन्हा दाखल झाला आहे. त्यात उमेदवारासह बरेच संचालक आहेत. जर त्यांनी काहीच केलं नसेल तर त्यांनी घाबरायचं कारण नाही," असा खोचक टोलाही लगावला.

उदयनराजे आणि माझ्यासह बऱ्याच जणांना उमेदवारीची अपेक्षा : "भाजपामधून उदयनराजे भोसले, मी स्वत:, पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि अजून बरेचसे उमेदवार अपेक्षित आहेत. मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे सातारकरांचा कौल घेऊन एक चांगला उमेदवार देतील. मग तो कुठलाही उमेदवार अथवा कुठलंही चिन्ह असो. तो उमेदवार लवकरच जाहीर होईल," अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.

हेही वाचा -

  1. शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवार गटाच्या आमदारावर घोटाळ्याचा गंभीर आरोप; काय आहे नेमकं प्रकरण? - Navi Mumbai Market Committee
  2. APMC Public Toilet Scam: 'एपीएमसी' घोटाळ्यामुळे राज्याचं ७.६१ कोटीचं नुकसान; माजी मंत्री शशिकांत शिंदेंसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  3. "अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळंच भारत विश्वचषक हरला"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - uddhav thackeray on amit shah
Last Updated : Apr 15, 2024, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details