महाराष्ट्र

maharashtra

विदर्भाची खास ओळख 'तान्हा पोळा'! 500 ते 3 लाख रुपयांपर्यंत नंदी बैल विक्रीसाठी उपलब्ध - Nagpur Tanha Pola Festival 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 3:26 PM IST

Updated : Sep 2, 2024, 3:38 PM IST

Nagpur Tanha Pola Festival 2024 : नागपूरसह संपूर्ण विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी 'तान्हा पोळा' भरण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. या दिवशी लाकडी बैलांना सजवून पोळा साजरा करतात. हा सण विदर्भ सोडून भारतात इतर कोणत्याही ठिकाणी साजरा केला जात नाही. यंदा लाकडी बैलांच्या म्हणजेच 'तान्हा' पोळ्यास 218 वर्षे पूर्ण होत आहेत.

Nagpur Tanha Pola Festival 2024
'तान्हा' पोळा (Source - ETV Bharat Reporter)

नागपूर Nagpur Tanha Pola Festival 2024 :'तान्हा पोळा' हा विदर्भाची खास ओळख आहे. लहान मुलांना बैलांचं महत्त्व समजावं म्हणून नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी सुरू या उत्सवाला सुरूवात केली. पूर्व विदर्भातील काही जिल्हांमध्ये पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा 'तान्हा पोळा' भरवला जातो. यासाठी वर्षभर विविध प्रकारच्या लाकडापासून सुंदर व आकर्षक नंदी बैल तयार केले जातात. हे लाकडी नंदी बैल आता लकडगंजच्या लकडा मार्केटमध्ये विक्रीसाठी तयार आहेत. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्यानं कारागीर आणि विक्रेते उत्साहित आहेत.

'तान्हा पोळा' उत्साहात साजरा (Source - ETV Bharat Reporter)

218 वर्षांची ऐतिहासिक परंपरा :218 वर्षांपूर्वी म्हणजेच 1806 मध्ये 'तान्हा पोळा' उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. 'तान्हा' पोळा साजरा करण्याची परंपरा राजे रघुजी भोसले (दुसरे) यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. लहान मुलांमध्ये बैलांबद्दल प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशानं 'तान्हा पोळा' साजरा करण्यात येतो.

पोळ्याच्या पाडव्याला भरतो 'तान्हा पोळा' :विविध सांस्कृतिक परंपरेनं नटलेल्या विदर्भात 'तान्हा' पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील अनेक जिल्यांमध्ये पोळा हा सण अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा करतात. 'तान्हा पोळा' हा सण राज्याच्या इतर भागात ज्याप्रमाणे बैलपोळा साजरा केला जातो, त्याच प्रमाणे साजरा केला जातो. मात्र, विदर्भात 'तान्हा पोळा' साजरा करण्याची परंपरा आहे. लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते, ही परंपरा गेल्या 217 वर्षांपासून आजही सुरू आहे.

शेकडो कुटुंबाला मिळतो रोजगार :लाकडी नंदी बैलांची विक्री करून आज शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. यंदा नंदी बैल विक्रीसाठी सज्ज असून, 500 ते 3 लाख रुपये किमतीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा बाजारात वेगळी रौनक असल्यानं या वर्षी किमान 100 कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचं बैल उत्पादकांचं म्हणणे आहे.

धातूच्या नंदी बैलांची मागणी वाढली :लाकडी नंदी बैलांच्या किमती खूप जास्त असल्यानं आता बाजारात स्वस्त दरात विविध प्रकारचे नंदी बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. धातूंच्या नंदी बैलांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण धातूंच्या नंदी बैलांना देखभालीचा खर्च कमी असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धातूच्या नंदी बैलांच्या मागणीत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचं दुकानदार सांगत आहेत.

महाग असूनही लाकडी नंदीबैलांची विक्री जोरात :लाकडी नंदी बैलांची विक्री दणक्यात सुरू झाली आहे. पोळ्या पाडव्याला साजऱ्या होणाऱ्या 'तान्हा' पोळ्यासाठी लाकडी नंदी बैलांचा बाजार सजलाय. सर्वात लहान नंदी बैलाची किंमत 300 रुपये असून सर्वात मोठा नंदी बैल 2.5 लाख रुपयांना विक्रीसाठी सज्ज आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी नंदी तयार केला जातो, त्या ठिकाणी नंदी बैल खरेदी करण्यासाठी हौशी नागपूरकरांची झुंबड असते. नागपूर शहरातील सुमारे शंभर कुटुंबं वर्षभर लाकडी नंदी बैल तयार करतात.

हेही वाचा

  1. ताशा कडाडला, ढोलही घुमला! 'नाशिक ढोल' पथकांचा आवाज देशात घुमणार; परराज्यातही क्रेझ, जाणून घ्या इतिहास - Nashik Dhol
  2. मेळघाटात रानभाजी महोत्सव : शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मारला 'आरा' भाज्यांवर ताव - Ranbhaji festival in Melghat
  3. अंडी उबवण्यासाठी मेळघाटात केला जातो 'या' खास पारंपरिक पद्धतीचा उपयोग - Egg Hatching System In Melghat
Last Updated : Sep 2, 2024, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details