नागपूरNagpur police -शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याचे बिट मार्शल्सला आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला अगदीचं शेवटच्या क्षणी जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. पत्नीनं जेवणात गरम भाजी न वाढता थंड भाजी वाढल्यानं नाराज झालेल्या या तरुणानं रागाच्या भरात पत्नी आणि मुलांना घराबाहेर काढले. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, म्हणतात ना "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्यय नागपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या पतीला बीट मार्शलकडून वाचविण्यात आलं.
एक फोन कॉल, संपूर्ण यंत्रणा लागली कामाला-नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस अंमलदार अतुल व मनोज हे सोमवारीला (6 मे) रात्री साडेआठ वाजताच्या ठक्करग्राम भागात पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग दरम्यान एका महिलेने ११२ या क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क केला. "लष्करी बाग" येथे राहणाऱ्या एका तरुणानं दारूच्या नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करत घराबाहेर काढल्याचं महिलेनं पोलीस नियंत्रण कक्षाला कळविलं. संदेश प्राप्त होताच बिटमर्शल्सने माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांना कळवली. राऊत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून, त्या ठिकाणी त्वरित पोलीस स्टेशन हद्दीतील इतर बीट मार्शल पोलीस अमलदार देवेंद्र व प्रफुल यांना देखील लष्करी बाग येथे जाण्यासाठी सूचना दिली. ते स्वत:ही घटनास्थळी पोहोचले.
माहिती समजताचं बिट मार्शल झाले दाखल-बीटमार्शल अतुल आणि मनोज हे अवघ्या पाच मिनिटात लष्करीबाग येथे दाखल झाले. त्या ठिकाणी लोकांची गर्दी गोळा झाली होती. बीट मार्शल्सनं घराबाहेर काढलेल्या महिलेची विचारपूस केली. तिने पती दरवाजा उघड नसल्याचं सांगितले. दोन्हीही बीट मार्शल महिलेची चौकशी करत असताना आणखी २ बीट मार्शलदेखील दाखल झाले.
दार तोडून पाहिले तर पंख्याला लटकलेला तरुण- बीट मार्शलनं दरवाजा वाजवून आतून प्रतिसाद आला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून बीट मार्शलनं घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा घरात किर्रर्रर्र अंधार होता. त्यामुळे बीट मार्शलनं स्वतःच्या मोबाईल जवळील टॉर्च सुरू करून घरात काय परिस्थिती आहे, याचा अंदाज घेतला. तेव्हा महिलेचा पती आत्महत्येचा प्रयत्न करत होता. बीट मार्शल प्रफुल आणि देवेंद्र यांनी त्या व्यक्तीचे पाय पकडले. तर अतुल यांन त्याची सुटका केली.