महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कवर्धा येथील राणी दहरा धबधब्याच्या पाण्यात बुडून नागपूरच्या इंजिनीअरचा मृत्यू - Nagpur Engineer Death - NAGPUR ENGINEER DEATH

Nagpur Engineer Death : कावर्धा येथील राणी दहरा धबधब्यात बुडून नागपूरच्या इंजिनीअरचा मृत्यू झाला. पाणबुड्यांच्या पथकानं चार तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला. माहितीनुसार, मृत व्यक्तीला पोहायला येत नसल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांच्या मदतीनं मृतदेह धबधब्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

Nagpur Engineer Death
पाण्यात बुडून इंजिनीअरचा मृत्यू (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 3:57 PM IST

कवर्धा (छत्तीसगड) Nagpur Engineer Death :कवर्धा येथील राणी दहरा धबधब्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अल्फाज अन्सारी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो नागपूरचा रहिवासी असून छत्तीसगडमधील रायपूर येथील एपीएल अपोलो स्टील प्लांटमध्ये इंजिनीअर पदावर कार्यरत होता.

अल्फाज अन्सारी आपल्या 19 मित्रांसह रायपूरहून कवर्धाला फिरण्यासाठी आला होता. राणी दहरा धबधब्यात आंघोळ करण्यासाठी तो मित्रांसोबत फिरायला गेला होता. यादरम्यान अल्फाज अन्सारी अंघोळ करत असताना अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. त्याच्या मित्रांनी स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चार तासांच्या प्रयत्नानंतर पाणबुड्यांच्या मदतीनं अल्फाज अन्सारीचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूय.

अल्फाजला पोहायला येत नव्हतं : अल्फाजसोबत त्याच्या कंपनीत काम करणारे 19 मित्र राणी दहरा धबधब्याला भेट देण्यासाठी आले होते. यादरम्यान सर्व मित्र आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मृत अल्फाजला पोहायला येत नव्हतं, तरीही तो पाण्यात उतरला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं तो वाहून गेला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्र्यांच्या पुतण्याचाही झालाय मृत्यू : उपमुख्यमंत्र्यांच्या पुतण्याचाही या धबधब्यात मृत्यू झाला आहे. ही घटना महिनाभरापूर्वी घडली होती. असं असतानाही आजतागायत या धबधब्यात कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीही असाच एक प्रकार उघडकीस आला होता, ज्यामध्ये कवर्धा येथील तीन ते चार तरुण सुट्टीच्या दिवशी राणी दहरा धबधब्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते, त्यावेळी दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.

हेही वाचा

  1. दशकभरानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका, 11 वाजेपर्यंत 26.72 टक्के मतदान - Jammu Kashmir Assembly Election
  2. अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, आतिशी सरकार स्थापन करणार - Arvind Kejriwal resigns
  3. हे काय... रेल्वेचं इंजिन रुळावरुन उतरलं अन् चक्क शेतात धावू लागलं; विश्वास बसत नाही ना, एकदा व्हिडिओ पाहाच - Train Engine Derailed

ABOUT THE AUTHOR

...view details