साताराYouth Father Murder Case :सुनेला पळवून नेल्याच्या रागातून विवाहितेच्या सासऱ्याने तरुणाच्या वडिलांची चाकूने वार करून (Murder of father) हत्या केली. यानंतर मृताची आई आणि भावावर खुनी हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना बुधवारी (१४ मार्च) रात्री कराड तालुक्यातील सैदापूर गावात घडली आहे. या घटनेत या तरुणाचे वडील (रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित सासऱ्याला (रा. सैदापूर, ता. कराड) कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे.
धमकी देत मुलाच्या वडिलांचा खून :कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर (ता. कराड) येथील संतोष देसाई यांच्या अंबक वस्तीवर गुऱ्हाळ आहे. त्यांच्या गुऱ्हाळावर पती पत्नी तसंच दोन मुले असे चौघेजण ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते. बुधवारी (दि. 13) रात्री ९ च्या सुमारास संशयित खून करणारा सासरा हा मोटरसायकलवरून सून पळवून (daughter in law) नेणाऱ्यांच्या घरी आला. आपल्या सुनेला तुमच्या मुलानं पळवून नेलं आहे. तुम्हाला मस्ती आली आहे. आता तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही. संपवून टाकतो, असं म्हणून खिशातील चाकू काढला आणि सुनेला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या वडिलांच्या छातीवर तीन वार करून तसंच चाकू भोकसून त्यांची हत्या केली.