महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - मुंबईत बॉम्ब

Mumbai Bomb Threat : मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. पोलीस सध्या मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Bomb Threat
Bomb Threat

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 9:22 AM IST

Updated : Feb 2, 2024, 10:03 PM IST

मुंबई Mumbai Bomb Threat :मुंबई पोलिसांनाशहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा संदेश मिळाला आहे. मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून हा धमकीचा संदेश मिळाला. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

अनेकदा धमक्या बनावट मिळाल्या : गेल्या काही महिन्यांपासून देशातील मोठी शहरं आणि विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या सातत्यानं मिळत आहेत. मात्र तपासानंतर या धमक्या बनावट असल्याचं निष्पन्न झालंय. मुंबई पोलिसांना या आधीही अनेकदा बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला कॉलद्वारे या धमक्या मिळाल्या. मात्र या सर्व धमक्या पोकळ असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय.

राम मंदिरं उडवण्याची धमकी : योध्येत 22 जानेवारीला झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली होती. स्वत:ला दाऊद इब्राहिम टोळीचा छोटा शकील म्हणवून घेणाऱ्या एका तरुणानं ही धमकी दिली होती. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच हालचाली सुरु केल्या. पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणाचे कॉल डिटेल्स काढले आणि त्याला बिहारमधील अररिया येथून अटक करण्यात आली.

बंगळुरूतील 15 शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी : यापूर्वी डिसेंबरमध्ये बेंगळुरूतील 15 शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. सर्व शाळांना ईमेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आली. यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी स्वत: शाळेत जाऊन आढावा घेतला होता. तपासानंतर, हा धमकीचा संदेश खोटा असल्याचं निष्पन्न झालं होतं.

अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल-पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, वरळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी कुलाब्यातील छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालय आणि वरळीतील नेहरू सायन्स सेंटरला शुक्रवारी (६ जानेवारी) ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. या ईमेलमध्ये संबंधित ठिकाणी बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. मात्र, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि मुंबई पोलिसांचे श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असता त्यांना काहीही संशयास्पद आढळले नव्हते. मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल पाठवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हे वाचलंत का :

  1. राम मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी, बिहारमधून एकाला अटक; छोटा शकील असल्याचा दावा
  2. बेंगळुरूतल्या 15 शाळांना बॉम्बनं उडविण्याची धमकी; कर्नाटकात खळबळ, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी शाळेत जाऊन घेतला आढावा
  3. TCS Bomb Threat : 'टीसीएस'च्या ऑफिसला बॉम्बच्या धमकीचा कॉल, माजी महिला कर्मचाऱ्याचं कृत्य
Last Updated : Feb 2, 2024, 10:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details