मुंबई Salman Khan Firing Case : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या वांद्रे येथील राहत्या घरावर म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्यानं देशभरात खळबळ उडाली. दुचाकीस्वारांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी इमारतीच्या भिंतीला लागली. या हल्ल्याची बिश्नोई गँगनं जबाबदारी घेतली असल्याची माहिती पुढं आली आहे. आता या घटनेत मोठी अपडेट उघड झाली. गोळीबार करताना वापरेली दुचाकी रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या प्रकरणी तीन संशयितांना माहीम परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं :याप्रकरणी माहीम परिसरातून तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ते तिघं देखील बिश्नोई गँगचे असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्याचप्रमाणं "काल घटनास्थळावरुन महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले असून तपास सुरू असल्याचं," कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितलं.
सीसीटीव्हीमध्ये विशाल उर्फ कालू याचा चेहरा :सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची 10 पथकं तयार करण्यात आली आहेत. दुचाकीस्वारानं वापरलेली बाईक ही रायगड जिल्ह्यातील असल्यानं पोलिसांचं पथक रायगडमध्ये देखील रवाना झालं आहे. या गोळीबाराची सुपारी हरियाणातील गुरुग्राम येथील विशाल उर्फ कालू यानं घेतली असल्याचं तपासात स्पष्ट झालय. सीसीटीव्हीमध्ये विशाल उर्फ कालू याचा चेहरा दिसत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार जेलमध्ये असून हा गोळीबाराचा कट अमेरिका किंवा कॅनडा येथून रचल्याचा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा :
- सलमान खान गोळीबार प्रकरण : मुंबई पोलिसांनी 3 सशंयितांना पनवेलमधून घेतलं ताब्यात - Salman Khan Firing Case
- सलमान खान गोळीबार प्रकरणाची अनमोल बिश्नोईनं स्विकारली जबाबदारी; गोळीबार करतानाचं सीसीटीव्ही आलं समोर - Salman Khan Firing Incident
- सलमान खान गोळीबार प्रकरणाची अनमोल बिश्नोईनं स्विकारली जबाबदारी; गोळीबार करतानाचं सीसीटीव्ही आलं समोर - Salman Khan Firing Incident