मुंबई Mumbai Police :भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सिरीज 'हिरामंडी' सध्या खुप गाजत आहे. 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर आलेल्या या वेब सीरिजनं ओटीटीवर धुमाकुळ घातलाय. सोशल मीडियावर सर्वत्र केवळ 'हिरामंडी'चीच चर्चा सुरु असून आता मुंबई पोलिसांनीही त्याची दखल घेतलीय. मुंबई पोलिसांनी सुरक्षा मोहिमेअंतर्गत काही छायाचित्रं शेअर केली आहेत जी मजेदार आणि महत्त्वाची आहेत. संपूर्ण जग 'हिरामंडी' बद्दल बोलत असताना मुंबई पोलीस मागे का? मुंबई पोलीस आपल्या सुरक्षेच्या मोहिमेत 'हिरमंडी'चा वापर करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
हिरामंडीच्या धर्तीवर मुंबई पोलिसांची सुरक्षा मोहीम : मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं की, 'स्वातंत्र्य हा छंद नाही, नवाब साहेब, हे कधीही नियम न मोडण्याचं युद्ध आहे.' यासोबतच तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात सुरक्षा मोहिमेबाबत वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. तसंच दुसऱ्या चित्रात लिहिलंय,'एक बार देख लीजिए, दीवाना बना दीजिए, चालान काटने के लिए, तैयार हैं हम तो हेलमेट पहन लीजिए.' तर आणखी एका फोटोत, 'पुराने पासवर्ड दोहराए नहीं जाते, भुला दिए जाते हैं' असं लिहिले होते. तिसऱ्या पोस्टमध्ये 'ओटीपी बताने और बर्बाद होने के बीच कोई फर्क नहीं होता' असं लिहिलंय.