मुंबई Mumbai Mega Block: मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांना आज मनस्ताप सहन करावं लागणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज(९ जून) ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणे मधील तांत्रिक कामांकरिता मेगा ब्लॉक असणार आहे. परिणामी प्रवास करताना प्रवाशांना मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. यामुळे लोकलच वेळापत्रक तपासूनच बाहेर पडावे. तसच ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
रविवार आणि शनिवारी तसेच सुट्टीच्या दिवशी लोकांची वर्दळ कमी असते. परंतु नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी मेगा ब्लॉकचा फटका बसणार हे निश्चित आहे. गेल्या आठवड्यातच मध्य रेल्वेकडून विशेष मेगा ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. तीनही उपनगरीय लोकल सेवेवर रविवारी मेगाब्लॉक राहणार आहे.
कुठं किती तास ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर पाच तासाचा मेगाब्लॉक: पश्चिम रेल्वेवर रेल्वेचा ट्रॅक सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांचा मेंटेनन्सकरण्यासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असणार आहे. जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. सकाळी 10.35 वाजल्यापासून ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत आप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकात शॉर्ट टर्मिनेटेड रिव्हर्स करण्यात येणार आहे. पाच तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे.
हार्बर मार्गांवरील ब्लॉक: लोकल मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी असा ब्लॉक राहील तर वांद्रे अप- डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक राहील. सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. या कालावधीत सीएसएमटी - पनवेल, बेलापूर वाशी अपडाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द केली आहे. तर गोरेगाव वांद्रे येथून सीएसएमटीसाठी जाणारी अप हार्बर लाइन वरील सेवा बंद राहणार आहे. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुख्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवर ब्लॉक: मध्य रेल्वेवर वरील विविध अभियांत्रिकी आणि देखभाली संदर्भातील काम पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.04 ते दुपारी 2.46 पर्यंत डाउन धीमी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबणार,पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळविले जाणार आहे.