महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अविश्वसनीय आणि अनपेक्षित-रमेश चेन्निथला - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

Mumbai konkan assembly election results 2024
मुंबई कोकण विधानसभा निवडणूक निकाल (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 7:14 AM IST

Updated : Nov 23, 2024, 7:48 PM IST

मुंबई- राज्यातील मुंबई आणि कोकण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयार करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी २६ वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे. शिवसेनेतील फुटीपूर्वी मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. आता हा बालेकिल्ला राखण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना यश येणार का? की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा आपलं वर्चस्व तयार करणार? याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आङे.

LIVE FEED

7:44 PM, 23 Nov 2024 (IST)

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अविश्वसनीय आणि अनपेक्षित-रमेश चेन्निथला

"महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अविश्वसनीय आणि अनपेक्षित, स्वीकारण्याजोगा नाही. या निकालाबाबत चौकशी करणार आहोत. सखोल कारणमीमांसा करणार आहोत," असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्रातील जनतेवर आमचा विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं.

3:37 PM, 23 Nov 2024 (IST)

मी लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो-देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनते पुढे आम्ही नतमस्तक आहोत. विरोधकांना जनतेने कृतीतून उत्तर दिले आहे. आम्ही सांगितले होते. आम्ही अभिमन्यू आहोत. आम्ही चक्रव्ह्यू आम्ही भेदला. विशेष करून मी लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. ज्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्यावर विश्वास ठेवला. लोकसभेत फेक नरेटीव्ह पसरवला गेला होता. त्याला यंदाच्या निवडणुकीत जनतेने उत्तर दिले आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही. हे आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसणार आहोत. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील."

3:04 PM, 23 Nov 2024 (IST)

आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विजय मिळवला

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. या ठिकाणी शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणात होते.

1:16 PM, 23 Nov 2024 (IST)

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवली-विनोद तावडे

भाजपाचे महामंत्री विनोद तावडे यांनी निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भरघोस मतदान केलं आहे. त्यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले यांनी काम केलं आहे. त्यावरून अप्रत्यक्ष लाभाचे राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाचे राजकारण महायुती सरकारने केल्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला. भाजपाशिवसेनेची नैसर्गिक युती ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी 2019 ला तोडली. त्याचा एक विशिष्ट राग बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये होता. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवली."

12:55 PM, 23 Nov 2024 (IST)

अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. तसंच चंद्रबाबू नायडू यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही बोलणं झालं. लॅन्ड स्लाइड व्हिक्टरी असं म्हणत दोघांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. अजित दादांचेही फोनवरून अभिनंदन करण्यात आले. लाडकी बहीण योजनेमुळे झाला विजय अशी दोघांची चर्चा झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.

12:47 PM, 23 Nov 2024 (IST)

दीपक केसरकर आघाडीवर

सावंतवाडी - एकोणीसाव्या फेरीअंती शिवसेना (शिंदे) दीपक केसरकर 34200 मतांनी आघाडीवर

12:03 PM, 23 Nov 2024 (IST)

अथक मेहनतीचा विजय - खासदार श्रीकांत शिंदे

ठाणे - महायुतीनं आघाडी घेतल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष सुरू केला आहे. यावेळी खासदार शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला. हा विजय महायुतीने गेल्या दोन वर्षात घेतलेले अनेक निर्णय आणि लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी अभियान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या अथक मेहनतीचा विजय असल्याचं खासदार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

11:59 AM, 23 Nov 2024 (IST)

वरळी मतदारसंघ अपडेट

राज्यातील सर्वांच लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात शिवसेना भाजपा आणि मनसेमध्ये लढत आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे.

वरळीमध्ये 6 फेरी

आदित्य ठाकरे - 21,725

मिलिंद देवरा - 21,072

संदीप देशपांडे - 9,190

आदित्य ठाकरे 703 मतांनी आघाडीवर

11:53 AM, 23 Nov 2024 (IST)

महाराष्ट्र विधानसभेचा पहिला निकाल हाती आाला आहे. वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत.

11:30 AM, 23 Nov 2024 (IST)

अंबरनाथ विधानसभा निकाल अपडेट

अंबरनाथ विधानसभा निकाल अपडेट

(9th फेरी)

१) शिवसेना शिंदे गट डॉ.बालाजी किणीकर - 4318

२) शिवसेना यूबीटी राजेश वानखेडे - 2606

नोटा - 0

डॉ.बालाजी किणीकर 13206 मताने आघाडीवर

10:43 AM, 23 Nov 2024 (IST)

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतमोजणी

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतमोजणी

फेरी - 4

एकनाथ शिंदे - 6036

केदार दिघे - 1081

मतांचा फरक - 5013

एकूण

एकनाथ शिंदे - 25023

केदार दिघे - 5888

मतांचा फरक - 19135

10:24 AM, 23 Nov 2024 (IST)

उल्हासनगर विधानसभा तिसऱ्या फेरीत भाजपचे कुमार आयलानी 6478 मतांनी पुढे

उल्हासनगर विधानसभा

260 बूथ

19 फेऱ्या मतमोजणी

तिसरी फेरी

कुमार आयलानी ( भाजप )

15450

ओमी कलानी ( राष्ट्रवादी शरद पवार पक्ष )

8972

भगवान भालेराव ( मनसे )

1397

संजय गुप्ता ( वंचित आघाडी )

1076

भारत गंगोत्री ( अपक्ष बंडखोर )

236

तिसऱ्या फेरीत भाजपचे कुमार आयलानी 6478 मतांनी पुढे

10:22 AM, 23 Nov 2024 (IST)

कल्याण पश्चिम विधानसभा शिवसेना (शिंदे) विश्वनाथ भोईर आघाडीवर

कल्याण पश्चिम विधानसभा शिवसेना (शिंदे) विश्वनाथ भोईर आघाडीवर

मुलुंड - पाचव्या फेरी अखेर मिहिर कोटेचा २०७०० मतांनी आघाडीवर

भांडुप पश्चिम तिसरा राऊंड

रमेश कोरगावकर - 12472

अशोक पाटील -10170

शिरीष सावंत -1858

रमेश कोरगावकर आघाडीवर

10:04 AM, 23 Nov 2024 (IST)

महायुती 145 ठिकाणी आघाडीवर

महायुतीने 145 ठिकाणी आघाडी घेऊन सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा पार केल्याचं दिसतंय. ( एकूण 171 जागा - भाजप 90, शिवसेना 49, राष्ट्रवादी 32) महाविकास आघाडीनं 47 जागांवर आघाडी घेतलीय (शिवसेना (UBT) 18, काँग्रेस 17, NCP-SCP 12) इतर आणि 18 वर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

9:34 AM, 23 Nov 2024 (IST)

घाटकोपर पश्चिमसह विक्रोळी विधानसभात कोण आघाडीवर?

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राम कदम आघाडीवर

राम कदम: 3900

गणेश चुक्कल: 1228

संजय भालेराव: 1747

---------

विक्रोळी विधानसभा मतदारसंघात सुनील राऊत आघाडीवर

915 विश्वजी ढोलम

3800 सुनील राऊत

2712 सुवर्णा करंजे

पहिल्या फेरीत सुनील राऊत आघाडीवर

9:30 AM, 23 Nov 2024 (IST)

राष्ट्रवादी १५ जागांवर तर राष्ट्रवादी एसपी ८ जागांवर आघाडीवर

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भाजपा ३१ जागांवर, शिवसेना २० जागांवर, राष्ट्रवादी १५ जागांवर, राष्ट्रवादी (एसपी) ८ जागांवर, काँग्रेस ५ जागांवर, शिवसेना (उद्धव ठाकरे) ४ जागांवर आघाडीवर आहे.

9:25 AM, 23 Nov 2024 (IST)

वांद्रे पूर्व मतदारसंघ वरुण सरदेसाई आघाडीवर

वांद्रे पूर्व मतदारसंघ

वरुण सरदेसाई 662 आघाडीवर

वरुण सरदेसाई 2791

झिशान सिद्दीकी 2129

तृप्ती सावंत 1491

9:25 AM, 23 Nov 2024 (IST)

भिवंडी पश्चिम

पहिली फेरी

भाजपा- महेश चौगुले- 4764

काँगेस - दयानंद चोरगे- 1023

अपक्ष - विलास पाटील- 1368

समाजवादी - रियाज आजमी- 1368

वारीश पठाण - 298

भिवंडी पश्चिम मतदारसंघात भाजपाचे महेश चौगुले 3396 मतांनी आघाडीवर

---------------------------

अंबरनाथ - पहिली फेरी

डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे - ४२१९

राजेश देवेंद्र वानखेडे, शिवसेना उबाठा - २४७१

पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर १७४८ मतांनी आघाडीवर!

------------------------------------

ओवळा-माजीवडा ( दुसरी फेरी )

प्रताप सरनाईक - ( शिंदेंची शिवसेना ) 8091

नरेश मणेरा - ( ठाकरेंची शिवसेना )- 2417

संदीप पाचंगे ( मनसे ) - 375

11542 मतांनी प्रताप सरनाईक आघाडीवर

9:24 AM, 23 Nov 2024 (IST)

मिहीर कोटेचा 4 हजार 58 मतांनी आघाडीवर

मुलुंड मतदारसंघातून मिहीर कोटेचा 4 हजार 58 मतांनी आघाडीवर आहेत.

9:24 AM, 23 Nov 2024 (IST)

भिवंडीत काय आहे स्थिती

उबाठा - महादेव घाटाळ - 2460

अपक्ष - मनीषा ठाकरे- 613

शिवसेना शिंदे गट - 5311

वनिता कथोरे मनसे - 273

शिवसेनेचे शांताराम मोरे 2851 मतांनी आघाडीवर

-----------------------------------

कल्याण ग्रामीण मतदारसंघात

शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे 2700 मतांनी आघा

9:04 AM, 23 Nov 2024 (IST)

पहिल्या फेरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४२३१ मतांनी आघाडीवर

  • शहापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा पोस्टल मतांनी आघाडीवर
  • विक्रोळी पोस्टल मतदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत आघाडीवर
  • वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर साडेसहा हजार मतानी आघाडीवर
  • वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर
  • पहिल्या फेरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४२३१ मतांनी आघाडीवर

8:42 AM, 23 Nov 2024 (IST)

माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर

वर्सोवा पोस्टल मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता 14 टेबलवर 22 फेऱ्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ठाण्यात मतमोजणी निकालापूर्वीच कळवा मुंब्रात जितेंद्र आव्हाड यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. कल्याण पश्चिममध्ये पोस्टल मतदानाला उशिराने सुरवात झाली आहे. माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर आहेत.

8:26 AM, 23 Nov 2024 (IST)

टपाली मतमोजणीला सुरुवात, कोण आहे आघाडीवर?

बहुतांश टपाल केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विक्रोळी विधानसभा एकूण फेऱ्या आहेत. तर टेबल - 14 आहेत. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये 442 पोस्टल मतांची मतमोजणी सुरू आहे. ठाण्यात मुंब्रा कळवा, कोपरी पाचपाखाडी ओवळा माजीवाडा येथे टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

7:23 AM, 23 Nov 2024 (IST)

मुंबादेवी हा बहुधा सर्वात मागासलेला मतदारसंघ-शायना एनसी

शिवसेना नेत्या शायना एन.सी. सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "मुंबादेवी हा बहुधा सर्वात मागासलेला मतदारसंघ आहे. लोकांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट ही सर्वात मोठी समस्या आहे. महिलांना सुरक्षितता हवी आहे. मतदारसंघात रुग्णालये आणि शाळा नाहीत. दुर्दैवाने, मोकळ्या जागा हे फक्त आहे. मुंबादेवी हा आदर्श मतदारसंघ बनवण्यासाठी योग्य विकास योजना तयार करणे गरजेचं आहे. महायुतीचे सरकार पुन्हा यावे यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी मी आले आहे."

7:15 AM, 23 Nov 2024 (IST)

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन. सी यांनी मतमोजणीपूर्वी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

Last Updated : Nov 23, 2024, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details