पालघरः मुंबईची जीवनवाहिनी ठरलेल्या उपनगरीय आणि अन्य एक्सप्रेस गाड्यांमुळे वर्षभरात अडीच हजार जणांचा बळी जातो. कधी अपघात प्रवाशांच्या चुकीमुळे तर कधी रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे मृत्यू होत असतात. पालघरमध्येही पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यानं लोकांना रेल्वेचे रूळ ओलांडावे लागतात. त्यातून अपघात होत असून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात.
पालघर येथे रेल्वेनं हनुमान मंदिर चौक येथील फाटक बंद ठेवलं आहे. त्यामुळे त्या भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी कोणताच मार्ग नसल्यानं रेल्वे रुळ ओलांडावे लागतात. कधी-कधी रेल्वेच्या वेगाचा अंदाज न आल्याने लोक घाईघाईत रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनेक अपघात घडतात. उपनगरीय रेल्वेकडून मिळालेल्या आकडेवारीचा विचार करता सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना होतात.
बिहारमधील दोन मजूर ठार-पालघरमध्ये शुक्रवारी रात्री अशीच एक घटना घडली. बिहार राज्यातील मोतिहारी जिल्ह्यातील तरुण रोजगारानिमित्त पालघर जिल्ह्यात आले आहेत. बोईसर पूर्वेला एका उद्योगात वेल्डिंग आणि इतर काम करणारे हे मजूर गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालघरला आले होते. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करून ते पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडत होते. त्यावेळी मुंबईहून जयपूरकडे जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस एका ट्रॅकवरून येत होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरून उपनगरीय गाडी येत असल्याने दोन ट्रॅकच्यामध्ये हे तिघे थांबले. भरधाव गाडी आल्यानं या गाडीचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. तरी एक जण जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे.
रेल्वेचे फाटक बंद असल्यानं प्रवाशांवर मृत्यूची टांगती कुऱ्हाड; पालघरमध्ये रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू - TRAIN ACCIDENT DEATH
पालघर जिल्ह्यातील बंद रेल्वे फाटकावर शुक्रवारी दोन जणांना रेल्वेने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली.
Published : Dec 28, 2024, 10:55 AM IST
|Updated : Dec 28, 2024, 2:40 PM IST
मृत्यूचे चक्र सुरूच राहणार का?-गेल्या अनेक वर्षापासून पालघर रेल्वे फाटक बंद करण्यात आलं आहे. परंतु त्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग रेल्वेनं उपलब्ध करून दिला नसल्यानं नागरिकांना नाईलाजाने रेल्वे फाटक ओलांडून पूर्व-पश्चिम असा प्रवास करावा लागतो. असा प्रवास करणाऱ्यांची संख्या शेकडोत आहे. त्यात येथून उपनगरी आणि एक्सप्रेस गाडीची संख्या मोठी असल्यानं प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. याबाबत रेल्वे प्रशासनानं पर्यायी व्यवस्था नागरिकांना उपलब्ध करून दिली नाही तर मृत्यूचं हे चक्र असेच चालू राहण्याची शक्यता आहे. उपनगरीय लोकलमुळे दरवर्षी जाणाऱ्या बळींची संख्या पाहिली, तर ‘लोकल ट्रेन’ या ‘डेथ ट्रेन’ झाल्या आहेत, असे एकंदरीत चित्र आहे. त्यातच रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. मुंबई उपनगरीय क्षेत्रात कल्याण खालोखाल पालघर येथे रेल्वेखाली सर्वाधिक आत्महत्या होतात, असं रेल्वेची आकडेवारी सांगते.
हेही वाचा-