महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणीवरील बलात्कार, खून प्रकरण: सहआरोपीस उच्च न्यायालयाकडून जामीन

Girl Rape Case : तरुणीवरील बलात्कार, खून प्रकरणातील सहआरोपीस उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 6 सप्टेंबर 2017 रोजी आरोपी विद्यार्थी अक्षय वालोदे यास अटक केली. त्याने भरपूर तुरुंगवास भोगलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध दाखल्यांच्या आधारे अनिश्चित काळासाठी तुरुंगात टाकले जाऊ शकत नाही. त्यामुळे काही शर्ती आणि अटींच्या आधारे आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला.

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 5:20 PM IST

Rape Case
रेप केस

मुंबई Girl Rape Case :6 सप्टेंबर 2017 रोजी विद्यार्थी असलेला अक्षय वालोदे त्याचा मित्र मुख्य आरोपी निखिलेश पाटील आणि दुसरा सह आरोपी निलेश खोब्रागडे (राहणार नागपूर) या तिघांनी निखिलेश याच्या 22 वर्षीय मैत्रिणीला एका कारमध्ये कोंबलं. यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिच्या तोंडावर उशी दाबून खून केल्या संदर्भातील एफआयआर नोंदवला गेला होता. 12 जुलै, 2022 मध्ये याबाबत विद्यार्थी अक्षय वालोदे याच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलं होतं. सात वर्षांपासून तो तुरुंगवास भोगत होता. त्यानं मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावेळेला उच्च न्यायालयानं म्हटलं, "आरोपीनं बराच काळ तुरुंगवास भोगलेला आहे, त्यास अनिश्चित काळासाठी तुरुंगात टाकलं जाऊ शकत नाही. मात्र गुन्हा गंभीर आहे, आरोप गंभीर आहेत" असे म्हणत अटी आणि शर्तीच्या आधारे जामीन मंजूर केलेला आहे. 24 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं हे आदेशपत्र जारी केलेले आहे.


बलात्कारानंतर तिघांनी खून केल्याचा गुन्हा दाखल :नागपूर येथील राहणारा निखिलेश पाटील आणि निलेश खोब्रागडे हे कारनं मुंबईला येण्यासाठी निघाले. यानंतर औरंगाबादला पोहोचले आणि तिथून पुण्याला गेले. पुणे येथून मैत्रिणीला सोबत घेतलं आणि नंतर ते अक्षय वालोदे याच्या घरी अंबरनाथ इथे आले. येथे तिचा बलात्कार करुन खून करण्यात आला. तसेच बेळगाव कर्नाटक महामार्गावर तिचा मृतदेह फेकून दिला आणि तिच्या वस्तू गोव्याला जाताना रस्त्यात फेकून दिल्या, असा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे 6 सप्टेंबर 2017 रोजी दाखल झाला होता. ह्या बाबत मयत मैत्रिण हिचा मित्र रिषभ आणि कुणाल यांनी सीआरपीसी 164 अंतर्गत कबुली जबाब दिला होता की, ''पुण्याहून आरोपी निलेश खोब्रागडे आणि निखिलेश पाटील यांच्यासोबत त्यांची मैत्रिण कारने गेली होती. नंतर ते तिन्ही लोकं अक्षय याच्या घरी गेले होते." पोलिसांच्या तपासात अक्षयने काही वस्तू खरेदी करण्यासाठी निखिलेश पाटील आणि निलेश खोब्रागडे यांना मदत केली होती. हे समोर आले होते.


'या' अटींवर जामीन मंजूर:आरोपी अक्षय वालोदेच्या वतीनं वकील प्रशांत पांडे यांनी बाजू मांडली. "निखिलेश पाटील आणि निलेश खोब्रागडे यांनी मैत्रिणीला कारमध्ये आणलं. अक्षयच्या घरी सर्व आले असता अक्षय सोबत मैत्रिणीचा शरीर संबंध झाला होता. त्यापैकी सहआरोपी याचा प्रत्यक्ष खुनात सहभाग नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. परिणामी अक्षय वालोदे यानं सहा वर्ष शिक्षा भोगलेली आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळायला हवा." न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी उपलब्ध तथ्याच्या आधारे 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डच्या आधारे आणि दर महिन्याच्या शनिवारी सायंकाळी चार ते सहा संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, या अटीवर जामीन मंजूर केला.

हेही वाचा:

  1. भाजपाच्या दोन खासदारांमधील वैर शमलं? सतरा वर्षानंतर घेतला दोघांनी एकत्र 'चहा'
  2. कहरच! चक्क ड्रायव्हरविना धावली रेल्वे गाडी, कठुआ रेल्वे स्थानकातील प्रकार
  3. शिक्षिकेच्या पर्समधून 35 रुपये गायब; थयथयाट करत विद्यार्थ्यांना मंदिरात नेऊन दिली शपथ

ABOUT THE AUTHOR

...view details