मुंबई Mumbai Crime News : कुलाबा परिसरात ताज हॉटेलच्या मागे टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका शिवीगाळ करुन किरकोळ मारहाण केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. जम्मू-काश्मीर स्टुडंट्स असोसिएशननं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबईतील कुलाबा परिसरात एका काश्मिरी व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यात लक्ष घालून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची विनंती केलीय.
गेल्या 18 वर्षांपासून टेलरिंगचा व्यवसाय : जम्मू-काश्मीर स्टुडंट्स असोसिएशननं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई, महाराष्ट्रातील कुलाबा परिसरात एका काश्मिरी व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केलीय. असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक नासिर खुहेमी यांनी एका निवेदनात म्हटलंय की, मंगळवारी घडलेल्या या घटनेनं काश्मिरी समुदायाला खूप अस्वस्थ केलंय. महाराष्ट्रात राहणाऱ्या काश्मिरी लोकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झालीय. कुलाबा परिसरात तक्रारदार युनूस रथर यांचा टेलरिंगचा व्यवसाय गेल्या 18 वर्षांपासून सुरू आहे. त्यांना गेल्या 18 वर्षात काहीही त्रास नव्हता.
काही गुंडांनी मला धमकावत शिवीगाळ केली. काश्मीरला परत जाण्यास सांगितलं, अशी माहिती तक्रारदार युनूस रथर यांनी दिलीय. मूळचे काश्मीर असलेले युनूस हे टेलरिंगचा व्यवसाय करतात. मात्र, त्यांच्याच दुकानानजीक असलेल्या दुकानातील व्यवसायिकाकडून युनूस यांना मंगळवारी मारहाण झाली होती. त्यानंतर ते रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. याप्रकरणी युनूस यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी कलम ३२३ आणि ५०६ अन्वये तीन दिवसांपूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोवते यांनी दिलीय.
जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र : युनूस हे काश्मिरी असून ते काश्मीरमधील श्रीनगर येथील पादशाही बाग येथील आहेत. मात्र, युनूस हे गेल्या 18 वर्षांपासून मुंबईत राहून आपला व्यवसाय करत आहेत. युनूस या व्यवसायिकाला रमझान सण तोंडावर आलेला असताना काही विदेशी क्लाईंट भेटण्यासाठी वाट पाहत होते. त्यावेळी ही मारहाण केल्याची घटना घडलीय. जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची केली आहे.
हेही वाचा :
- Nagpur Crime : नागपूर हादरलं! घरात आढळले एकाच कुटूंबातील तीन जणांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या?
- Mumbai Murder News: दागिने शोरुम मालकाच्या पत्नीची घरातील नोकराकडून हत्या, बिहारला पळून जाताना रेल्वे स्थानकातून अटक