महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल मीडियावर ओळख: तरुणासोबत नाईट आऊटला गेलेल्या तरुणीवर नराधमाचा अत्याचार, पोस्ट शेअर करुन मागितला न्याय

Mumbai Crime News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर एका तरुणानं 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार केलाय. यासंदर्भात तरुणीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय.

Mumbai Crime News
Mumbai Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 5:42 PM IST

मुंबई Mumbai Crime News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर 21 वर्षीय तरुणी एका तरुणासोबत 13 जानेवारीला नाईट आऊटला गेली होती. त्यावेळी तिला एका हॉटेलमध्ये पार्टीत दारु पाजून मित्राच्या घरी बेशुद्ध अवस्थेत असताना बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केलाय. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


नेमकं काय घडलं : गुन्हा दाखल करुन 12-13 दिवस उलटून गेल्यानंतर पीडित तरुणीनं सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिनं तिला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक संस्था आणि मुंबई पोलिसांकडं याचना केलीय. या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिनं हकीकत सांगत लिहिलंय की, "सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणासोबत हँग आऊट करण्यासाठी नाईट आउटला निघालो असताना एका हॉटेलला पार्टी केली आणि मद्यपान केलं." दरम्यान, पीडित तरुणी तरुणाच्या मित्रांना भेटली. तिनं मद्यपान केल्यानंतर तिला नशा झाली होती. तरीदेखील तरुणानं तिला जास्त मद्यपान करण्यास आग्रह केला. त्यानंतर मद्यपान जास्त झाल्यानं पीडित तरुणी पूर्णतः ब्लॅक आउट झाली होती. याचाच फायदा घेत तरुणानं मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तरुणानं तिच्या तीन वेळा कानाखाली वाजवली. मात्र नशेत असताना पीडित तरुणासोबत काय काय झालं हे तिला आठवत नसल्याचं देखील तिनं पोलिसांना सांगितलंय. जखमी अवस्थेत मदतीसाठी पीडितेनं तिच्या चुलत भावाला फोन केला आणि पालकांना त्या रात्रीबद्दल सांगू शकत नाही, असं पीडितेनं सांगितलं. जेव्हा तिच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी ताबडतोब गुन्हा दाखल केला.

सोशल माध्यमांवर ओळख झालेल्या तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकपूर्व जामीनावर काल न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयानं 3 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला अंतरिम दिलासा दिलाय. - रवींद्र काटकर, वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

कोणत्या कलमांअन्वये गुन्हा दाखल : या घटनेनंतर आरोपीनं माफी मागणारा एक मेसेज देखील पीडित तरुणीला केलाय. त्या मेसेजच्या स्क्रीनशॉट देखील पीडित तरुणीनं शेअर केलाय. तसंच 21 वर्षीय पीडित तरुणी आता 12 दिवस उलटून गेल्यानं न्याय मागत आहे. मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही असं पीडितेनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. याप्रकरणी वरळी पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता 376 आणि 323 आदी विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल केलाय.

हेही वाचा :

चार कोटीचे दागिने लूट प्रकरण, 3 माजी सैनिकांसह पाच जणांना अटक

वर्धेत नरबळीचा प्रयत्न, बालकाला पूजा करण्याच्या बहाण्यानं बोलवून विहिरीत ढकललं

ABOUT THE AUTHOR

...view details