मुंबई Raid On Drug Factory: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) कक्ष 7 ने मोठी कारवाई करत अमली पदार्थांच्या कारखाना उद्ध्वस्त केला आहे. 252 कोटी 28 लाख किंमतीचा एमडी ड्रग्स साठा जप्त करण्यात आला आहे. तसंच 15 लाख 88 हजारांची रोख रक्कम आणि 25 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने ज्यांची किंमत एक लाख 50 हजार 420 आहे. तर एक सफेद रंगाची स्कोडा मोटर कार त्याची किंमत दहा लाख आहे, असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलीय.
अमली पदार्थाच्या कारखान्यावर कारवाई : मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 7 ने सांगली येथील हिरडी या गावात असलेल्या अमली पदार्थाच्या कारखान्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात (Kurla Police Station) अमली पदार्थ विरोधी कायदा कलम 8 (क), 22(क) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून घेतलं ताब्यात: कक्ष सातच्या पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, 16 फेब्रुवारीला सापळा रचून एका महिला आरोपीला सयाजी पगारे चाळीच्या बाजूच्या फुटपाथवर 641 ग्राम वजनाच्या एमडी ड्रगसह आणि ड्रग्सच्या व्यवसाय मधून मिळवलेली रोख रक्कम बारा लाख वीस हजार रुपये तसेच एक लाख 50 हजार 440 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह ताब्यात घेतलं. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून वरिष्ठांच्या आदेशानुसार कक्ष सात कार्यालयाकडं पुढील तपासासाठी हा गुन्हा देण्यात आलाय.
गुजरात येथून अटक: अटक महिला आरोपीकडं केलेल्या अधिक चौकशीत तिनं हे एमडी ड्रग्स मीरा रोड येथील तिच्या ओळखीच्या इसमांकडून आणल्याचं सांगितलं. त्यावरून पोलीस पथकानं एका पुरुष आरोपीला मिरा रोड येथून तीन किलोग्राम वजनाचा एमडी हा त्यांची किंमत सहा कोटी आणि तीन लाख 68 हजार रोख रक्कमेसह ताब्यात घेऊन अटक केली. या आरोपीकडं केलेल्या चौकशीत त्यानं अमली पदार्थ हा गुजरात राज्यातील सुरत येथे राहणाऱ्या दोघांना दिल्याचं सांगितल्यानं त्या दोन इसमांना गुजरात येथून अटक करण्यात आली.
कवठे महाकाळ येथे धडक कारवाई : पोलीस पथकानं वेगवेगळ्या ठिकाणच्या कारखान्याचा शोध घेऊन 25 मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इरळी या गावात धडक कारवाई केली. एकूण 122 किलो 500 ग्राम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केले. ज्याची किंमत 245 कोटी आहे. तसेच एमडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि वाहन ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये एकूण सहा पुरुष आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.
आरोपींची नावे...
१) परवीन बानो गुलाम शेख, वय-३३ वर्षे, रा. ठि. कुर्ला प. मुंबई
२) साजीद मोहम्मद आसिफ शेख उर्फ डेबस, वय २५ वर्षे, रा.ठि. मीरा रोड